INDvsSA: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात टॉसमध्ये झाली गडबड, कमेंटेटरने केली चूक

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 05, 2019 | 18:03 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

icc world cup 2019: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान टॉस खेळताना चांगलीच गडबड झाली.

india vs south africa toss
भारत वि दक्षिण आफ्रिका टॉस  |  फोटो सौजन्य: Twitter

साऊथम्पटन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचा सामना रंगत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या दरम्यान एक गडबड झाली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणे उडवले आणि कोहलीने हेड केले. मात्र टेल्स आले. त्याचवेळी कमेंटेटर म्हणाला की भारताने टॉस जिंकला आणि माईक कोहलीच्या दिशेने नेला. 

यावेळी मॅच रेफ्रीने यात सुधारणा करताना म्हटले टॉस दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. यानंतर मार्क निकोलस म्हणाले, भारताने नव्हे तर दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आहे. फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकताच पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेसिस म्हणाला, भारताविरुद्ध खेळणे ही नेहमी मोठी संधी असते. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने लुंगी एंगिडीच्या जागी स्पिनर तबरेज शम्सीला संधी दिली आहे. दोन्ही संघांनी या सामन्यात दोन दोन स्पिनर खेळवले आहेत. दक्षिण आफ्रिकाकडे इम्रान ताहीर आणि तबरेज शम्सी आहेत. तर भारताकडे कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल आहेत. 

भारताने या सामन्यात मोहम्मद शमीच्या ऐवजी भुवनेश्वर कुमारला संधी दिली आहे. संघात केदार जाधवचे पुनरागमन झाले आहे. तो आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाला होता. भारतीय संघात चौथ्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी विजय शंकरच्या जागी लोकेश राहुलला निवडण्यात आले आहे. 

भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळत आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. मात्र दोनही सामन्यात त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता तर दुसऱ्या सामन्यात त्यांना बांगलादेशने हरवले. त्यामुळे द. आफ्रिका संघाचे मानसिक खच्चीकरण झाले आहे त्यामुळे पराभवातून सावरून आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका कशी कामगिरी करते हे पहावे लागेल.

दुसरीकडे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच उंचावलेला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या इराद्यानेच उतरला आहे. भारताचे गोलंदाजही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडत आहे. युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह हे युवा खेळाडू पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करत आहेत. भारतीय चाहत्यांनाही टीम इंडियाकडून पहिल्या सामन्यात विजयाची अपेक्षा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी