मुंबई: भारतीय संघ(team india) पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत आधी सलग १३ सामने जिंकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करणार असे म्हटले जाते होते. मात्र द. आफ्रिकेविरुद्ध(south africa) नवी दिल्ली आणि कट्टकमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर आता मालिका पराभवाची टांगती तलवार आहे. आज मंगळवारी तिसऱ्या टी-२० सामन्यात जर भारताने विजय नाही मिळवला तर ही मालिका त्यांच्या हातून गेली. आज विशाखापट्टणममध्ये भारत आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. india vs south africa third t-20 match today
अधिक वाचा - पाच हवं काम; 9 लाख बँक कर्मचारी 27 जूनला असणार संपावर
अनेक खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतच्या संघाने काही चांगली कामगिरी केली असताना विजय मिळवण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. कट्टक आणि विशाखापट्टणम टी-२०मध्ये केवळ एक दिवसाच्या अंतराचा फरक असल्याने भारताकडे मालिकेत पुनरागमन करण्यास जास्त वेळ नाही. नवी दिल्लीमध्ये गोलंदाजा २१२ धावांचा बचाव करता आला नव्हता. तर कट्टकमध्ये भुवनेश्वर वगळता कोणत्याही गोलंदाजाला आपली छाप पाडता आली नाही.
दोन्ही सामन्यात इशान किशनने चांगला सलामीवीर म्हणून भूमिका साकारली. तर ऋतुराज गायकवा आणि श्रेयस अय्यरने यांनी वेगवान गोलंदाजांविरोधात आत्मविश्वास वाढवला. हार्दिक पांड्याने दिल्लीमध्ये काही आश्चर्यजनक पावर हिटिंग शॉट्स खेळले होे. मात्र कट्टकमध्ये पांड्या वेगवान गोलंदाज वेन पार्नेल विरुद्ध संघर्ष करताना दिसला. कर्णधार ऋषभ पंत दोन वेळा स्वस्तात बाद झाला आणि आपल्या नेतृत्वाने क्रिकेट जाणकारांना आश्चर्यचकित केले नाही. आता पंतला विशाखापट्टणममध्ये चांगले करण्याची संधी आहे.
गोलंदाजीत भारतासमोर अनेक आव्हाने आहात. कट्टकमध्ये पहिल्या सहा ओव्हरमध्ये तीन विकेटसह भुवनेश्वर कुमार ४ बाद १३ याशिवाय आवेश खान, आणि हर्षल पटेलसारख्या गोलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. स्पिनर युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेलची कामगिरी निराशाजनक राहिली. दुसरीकडे आफ्रिकेने सर्वच आघाड्यांवर चांगली कामगिरी केली.
भारत: ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, ईशान किशन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.
अधिक वाचा - हिंदीतील या वेब सीरिजना सर्वाधिक पसंती
दक्षिण अफ्रीका: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रॉस्सी वैन डेर डूसन, मार्को जानसेन आणि ट्रिस्टन स्टब्स.