India vs Sri Lanka 1st ODI in Barsapara Cricket Stadium Guwahati, Pitch Report, Weather Report, Match Time, Team India, Sri Lankan Team, Dream11 Team India, Dream11 Team Sri Lanka : भारताने श्रीलंकेविरुद्धची टी 20 सीरिज 2-1 अशी जिंकली. आता भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 मॅचची वन डे सीरिज सुरू होत आहे. या सीरिजची पहिली मॅच आज (मंगळवार 10 जानेवारी 2023) गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी मॅचचे थेट प्रक्षेपण सुरू होईल. ही मॅच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर बघता येईल. डीडी स्पोर्ट्स या टीव्ही चॅनलवर पण मॅचचे थेट प्रक्षेपण बघता येईल. डिस्ने प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपवर मॅचचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे. । स्कोअरकार्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यातील गुवाहाटी वन डे मॅचसाठी टॉस दुपारी 1 वाजता होणार आहे. गुवाहाटी येथील पिच बॅटिंगसाठी अनुकूल समजले जाते. यामुळे टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेणे फायद्याचे ठरू शकते. थंडीमुळे गुवाहाटीत लवकर सूर्यास्त होतो. सूर्यास्तानंतर हळू हळू दव पडण्यास सुरुवात होते आणि थंडीची तीव्रता वाढत जाते. या वातावरणात टिकून राहून खेळणे आणि जिंकणे हे एक आव्हान आहे.
गुवाहाटीत झालेल्या शेवटच्या इंटरनॅशनल वन डे मॅचमध्ये विंडीजने भारताला 323 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने सहज पार केले होते. यामुळे आजच्या डे नाईट मॅचमध्ये किती धावा होतात याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.
गुवाहाटीतले आजचे कमाल तापमान 27 अंश से. आणि किमान तापमान 13 अंश से. राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच आज पावसाची शक्यता नाही, असेही हवामान विभागाचा अहवाल सांगत आहे. यामुळे प्रेक्षकांना मॅचचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
जसा बाप तशी पोर; धोनीच्या मुलीला मिळाली मेस्सीच्या ऑटोग्राफची जर्सी