India vs Sri Lanka 2nd T20I, Pitch Report, Weather Report, Dream11 Team, Team India, Team Sri Lanka, IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 टी 20 मॅचची सीरिज भारतात सुरू आहे. या सीरिजची पहिली मॅच भारताने 2 धावांनी जिंकली. आज (गुरुवार 5 जानेवारी 2023) पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune or MCA Stadium, Pune) भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरी टी 20 मॅच होणार आहे. ही मॅच जिंकल्यास भारत तिसरी मॅच होण्याआधीच सीरिज 2-0 अशी जिंकू शकेल. पण श्रीलंकेने पुण्यातली मॅच जिंकली तर शनिवार 7 जानेवारी 2023 रोजी होणार असलेली तिसरी टी 20 मॅच निर्णायक होईल. यामुळे आज काय होणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.
आजच्या मॅचचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी 7 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर आणि डीडी स्पोर्ट्सवर होईल. मॅचचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवर होणार आहे. टॉस संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे.
मॅचच्या सुरुवातीला बॅटरना फायदा होईल. नंतर स्पिनर्सना पिचचा फायदा घेता येईल. जी टीम प्रथम बॅटिंग करेल त्या टीमला मॅच जिंकण्याची सर्वाधिक संधी मिळू शकेल असा अंदाज आहे. यामुळे टॉस कोण जिंकणार याला भरपूर महत्त्व आहे. कारण टॉस जिंकणाऱ्या टीमला बॅटिंगचा पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे.
आकाश ढगाळ राहील पण पावसाची शक्यता नाही. यामुळे संपूर्ण मॅच खेळली जाईल हे निश्चित आहे. दमट वातावरण राहणार आहे. या नंतर फिल्डिंग करणाऱ्यांना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 अंश से. आणि किमान तापमान 19 अंश से. राहणार आहे.