India vs Sri Lanka 3rd ODI at Greenfield International Stadium Thiruvananthapuram, Match Preview, Pitch Report, Weather Report, Team India, Team Sri Lanka, Dream11 Team India, Dream11 Team Sri Lanka : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या 3 वन डे मॅचच्या सीरिजची तिसरी वन डे आज (रविवार 15 जानेवारी 2023) ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. ही मॅच भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. टॉस दुपारी 1 वाजता होईल. मॅचचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर आणि डीडी स्पोर्ट्सवर होणार आहे तसेच मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवर होणार आहे.
भारताने पहिल्या दोन वन डे जिंकून सीरिज 2-0 अशी आधीच जिंकली आहे. आता तिसरी मॅच जिंकून भारत श्रीलंकेला व्हाईटवॉश देणार की तिसरी वन डे जिंकून श्रीलंका नामुष्की टाळणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
टीम इंडियाने गुवाहाटीत झालेली पहिली वन डे 67 धावांनी तर कोलकातामध्ये झालेली दुसरी वन डे 4 विकेट राखून जिंकली होती. आता तिसऱ्या वन डे मॅचमध्ये काय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
आज ढगाळ वातावरण राहील आणि संध्याकाळी दव पडेल. पण पावसाची शक्यता नाही. ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमची बाउंड्री लाईन कमी अंतरावर असण्याचा फायदा बॅटरना अर्थात फलंदाजांना होऊ शकतो तर खेळपट्टीचा फायदा वेगवान गोलंदाजांना होण्याची शक्यता आहे.
खांद्याच्या दुखापतीमुळे युजवेंद्र चहल दुसऱ्या वन डे मध्ये खेळला नव्हता. तो तिसऱ्या मॅचमध्ये खेळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. अर्शदीप सिंहला खेळवले जाण्याची शक्यता आहे.
अक्षर पटेल खासगी कारणांमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये खेळणार नाही. पण या सीरिजमध्ये वॉशिंग्टन सुंदर खेळणार आहे त्यामुळे सुंदरला आणखी आजमावण्याचा विचार टीम मॅनेजमेंट करण्याची दाट शक्यता आहे. तसा विचार झाल्यास वॉशिंग्टन सुंदर पण श्रीलंकेविरुद्ध तिसरी वन डे मॅच खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेच्या खेळाडूंपैकी दिलशान मदुशंका खांद्याच्या दुखापतीमुळे तर पाथुम निसांका पाठीच्या दुखण्यामुळे तिसरी वन डे खेळणार की नाही याबाबत संभ्रम आहे.
IND vs SL : सूर्यकुमार यादव चमकला, भारताने T20 सीरिज जिंकली, पहिली वन डे मंगळवारी
Saurabh Tiwari Viral Video : सौरभ तिवारी बॅट घेऊन धावला -चाहत्याच्या अंगावर!