India Vs West Indies 2nd ODI:विश्‍वविक्रमासह भारताचा विजय; पटेलचं वादळी अर्धशतक

टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (ODI match) वेस्ट इंडिजचा (West Indies) 2 गडी राखून पराभव केला. यासह भारताने (India) तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये वेस्‍ट इंडिजवर भारताचा हा सलग 12 वा मालिका विजय आहे. या विजयाने भारतीय संघाने सलग सर्वाधिक मालिकेत कोणत्याही एका संघाला पराभूत करण्याचा विश्वविक्रम केला आहे.

India Vs West Indies 2nd ODI
पटेलच्या वादळी अर्धशतकामुळे भारताचा विजय  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • सूर्यकुमार यादव 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये वेस्‍ट इंडिजवर भारताचा हा सलग 12 वा मालिका विजय
  • पाकिस्तान संघाने सलग 11 वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा पराभव केला आहे.


India vs West Indies Axar Patel: टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (ODI match) वेस्ट इंडिजचा (West Indies) 2 गडी राखून पराभव केला. यासह भारताने (India) तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये वेस्‍ट इंडिजवर भारताचा हा सलग 12 वा मालिका विजय आहे. या विजयाने भारतीय संघाने सलग सर्वाधिक मालिकेत कोणत्याही एका संघाला पराभूत करण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वीचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तान संघाने (Pakistan team) सलग 11 वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा पराभव केला आहे.

अक्षर पटेलने चमकदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याने 64 धावांची नाबाद खेळी खेळली. तर श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी अर्धशतके झळकावली. शार्दुल ठाकूरने गोलंदाजीत अप्रतिम 3 बळी घेतले.या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघाने 50 षटकात 6 गडी गमावून 311 धावा केल्या.

Read Also : द्रौपदी मुर्मू सोमवारी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार

कारकिर्दीतील 100 वा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या शाई होपने 115 धावांची खेळी खेळली. कर्णधार निकोलस पूरनने 74 धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने 49.4 षटकांत 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून श्रेयस अय्यरने ६३ धावा केल्या. त्याचवेळी संजू सॅमसनने 54 धावा केल्या. अक्षर पटेलने 64 धावांची तुफानी खेळी केली.

Read Also : घराच्या सुखासाठी असे असावे स्वयंपाक घर

भारतीय संघाकडून शिखर धवन आणि शुभमन गिल सलामीला आले. यादरम्यान धवन अवघ्या 13 धावा करून बाद झाला. तर शुभमनने 49 चेंडूत 43 धावा केल्या. त्याच्या खेळीत 5 चौकारांचाही समावेश होता. श्रेयस अय्यरने शानदार कामगिरी करताना अर्धशतक झळकावले. त्याने 71 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 63 धावा केल्या. सूर्यकुमार यादव 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप 

पहिल्या एकदिवसीय सामन्यात आपल्या बॅटने 97 धावांची शानदार खेळी खेळणाऱ्या शिखर धवनला दुसऱ्या वनडेत फार काही करता आले नाही. त्याने 31 चेंडूंचा सामना केला आणि केवळ 13 धावा केल्या. तर त्याच्या बरोबर सलामीला आलेला शुभमन गिल 43 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. काइल मेयर्सच्या चेंडूवर गिलने अतिशय खराब शॉट खेळला आणि त्याचा झेल घेतला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला सूर्यकुमार यादव फार काही करू शकला नाही.

शाई होपची कमाल

शाई होप आपल्या 100व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा जगातील 10वा फलंदाज ठरला. त्याच्या आधी गॉर्डन ग्रीनिज, ख्रिस केनर्स, मोहम्मद युसूफ, कुमार संगकारा, ख्रिस गेल, मार्कस ट्रेस्कोथिक, रामनरेश सरवन, डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांनी हा पराक्रम केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी