INDvsWI: टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज, पाहा आकडेवारीनुसार कोणाचं पारड जड

India vs West Indies: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मधील 34वी मॅच टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. जाणून घेऊयात आकडेवारीत दोन्हीपैकी कुठल्या टीमचं पारडं जड आहे.

India vs West Indies
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज  |  फोटो सौजन्य: AP

मॅन्चेस्टर: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप मधील 34  वी मॅच टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. मॅन्चेस्टर येथे ही मॅच रंगणार आहे. विराट कोहलीच्या नेत्रृत्वात टीम इंडिया या वर्ल्ड कपमध्ये चांगलं प्रदर्शन करत आहे. टीम इंडियाच्या यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत पाच मॅचेस झाल्या आहेत. त्यापैकी चार मॅचेसमध्ये टीम इंडियाने विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे तर एक मॅच पावसामुळे ड्रॉ झाली. यामुळे टीम इंडियाच्या खात्यात नऊ पॉईंट्स असून पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, वेस्ट इंडिजच्या टीमने सहा मॅचेसपैकी केवळ एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजची टीम तीन पॉईंट्ससह आठव्या क्रमांकावर आहे.

वेस्ट इंडिजच्या टीमला यापूर्वीच्या मॅचमध्ये न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे वेस्ट इंडिजच्या टीमला सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागलं आहे. आता वेस्ट इंडिजच्या टीमचा सामना भारतासोबत होणार आहे. 1983 साली टीम इंडियाने वेस्ट इंडिजचाच पराभव करत वर्ल्ड कप जिंकला होता. या दोन्ही टीम्समधील वर्ल्ड कपमधील रेकॉर्डवर एक नजर टाकली तर टीम इंडियाचं पारड जड असल्याचं दिसत आहे. 

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना

आतापर्यंत दोन्ही टीमची वर्ल्ड कपमध्ये आठ वेळा मॅच झाली आहे. या आठ मॅचेसपैसी टीम इंडियाने पाच वेळा विजय मिळवला आहे तर तीन मॅचेसमध्ये वेस्ट इंडिजने विजय मिळवला आहे. या आठ मॅचेसपैकी तीन मॅचेस या 1983 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्येच खेळल्या गेल्या होत्या. ज्यामध्ये टीम इंडियाने दोन मॅचेस जिंकल्या होत्या. पाहूयात वर्ल्ड कपमधील आकडेवारी काय सांगते...

  1. 1979 वर्ल्ड कप - वेस्ट इंडिजने 9 विकेट्सने मॅच जिंकली
  2. 1983 वर्ल्ड कप - टीम इंडियाने 34 रन्सने मॅच जिंकली
  3. 1983 वर्ल्ड कप - वेस्ट इंडिजने 66 रन्सने मॅच जिंकली
  4. 1983 वर्ल्ड कप - टीम इंडियाने 46 रन्सने मॅच जिंकली
  5. 1992 वर्ल्ड कप - वेस्ट इंडिजने 5 विकेट्सने मॅच जिंकली 
  6. 1996 वर्ल्ड कप - भारताने 5 विकेट्सने मॅच जिंकली
  7. 2011 वर्ल्ड कप - भारताने 80 रन्सने मॅच जिंकली
  8. 2015 वर्ल्ड कप - भारताने 4 विकेट्सने मॅच जिंकली

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
INDvsWI: टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज, पाहा आकडेवारीनुसार कोणाचं पारड जड Description: India vs West Indies: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मधील 34वी मॅच टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. जाणून घेऊयात आकडेवारीत दोन्हीपैकी कुठल्या टीमचं पारडं जड आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola