IND vs WI 1st ODI: टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिली वन-डे, चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार?

IND vs WI: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात गुरुवारी वन-डे सीरिजमधील पहिली मॅच खेळली जाणार आहे. टी-20 सीरिजमध्ये वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिल्यानंतर आता टीम इंडिया वन-डे सीरिज जिंकण्यासाठी मैदानात उतरणार

Team India
टीम इंडिया (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभवानंतर टीम इंडियाची पहिलीच वन-डे मॅच
  • शिखर धवन परतल्यानंतर लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर उतरण्याची शक्यता
  • टी-20 सीरिजमध्ये व्हाईट वॉश मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजची टीम वन-डे सीरिज जिंकण्याच्या प्रयत्नात

गयाना: टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देत पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आता गुरुवारी टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात वन-डे सीरिजची सुरूवात होत आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून मिळालेल्या पराभवानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच वन-डे मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. वर्ल्ड कप दरम्यान दुखापतग्रस्त झालेला टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन शिखर धवन या मॅचमधून वन-डे क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.

चौथ्या क्रमांकावर कोण?

टीम इंडियाकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी पुन्हा एकदा ओपनिंगसाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुल याला खेळवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅप्टन विराट कोहली आपल्या आवडत्या तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास उतरेल. केदार जाधव पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर बॅटिंसाठी उतरणार आहे. रिषभ पंत कुठल्या क्रमांकावर खेळण्यास उतरणार हे पहावं लागेल.

मधल्या फळीत चुरस

मधल्या फळीमधील दावेदारीसाठी मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्यात स्पर्धा असणार आहे. मनीष पांडे याने टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये अपेक्षप्रमाणे प्रदर्शन न केल्याने आता टीम मॅनेजमेंट श्रेयस अय्यरला संधी देण्याचा विचार करत आहे. तसेच फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार याला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहम्मद शमीकडे फास्ट बॉलिंगजी जबाबदारी असेल. तर नवदीप सैनीचं आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.

नुकत्याच झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाच सेंच्युरी झळकावणारा रोहित शर्मा आता पुन्हा एकदा आपला तोच फॉर्म कायम राखत मैदानात उतरणार आहे. वेस्ट इंडिजच्या समोर रोहित आणि शिखर धवन या ओपनर जोडीला रोखण्याचं आव्हान असणार आहे. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेंच्युरी झळकवणारा शिखर धवन दुखापतग्रस्त झाला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे.

टीम इंडियासमोर गेलचं आव्हान

रिषभ पंत आणि कृणाल पंड्या यासारख्या युवा क्रिकेटर्सने रन्स, विकेट्स घेत कॅप्टन विराट कोहलीला चांगलंच इम्प्रेस केलं. टी-20 सीरिजमध्ये कृणाल पंड्याला त्याच्या ऑलराऊंड प्रदर्शनामुळे मॅन ऑफ द सीरिज घोषित करण्यात आलं. टी-20 सीरिजमध्ये व्हाईट वॉश मिळालेल्या वेस्ट इंडिजच्या टीममध्ये आता वन-डे सीरिजसाठी स्टार बॅट्समन क्रिस गेल उतरणार आहे.

टीम

टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

वेस्ट इंडिजची टीम: जेसन होल्डर (कॅप्टन), क्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एव्हिन लेविस, शाय होप, शिम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन, रोस्टर चेस, फॅबियान ऑलीन, कालोर्सस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डर कॉट्रेल, ओशाने थॉमस, केमार रोच.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
IND vs WI 1st ODI: टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिली वन-डे, चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? Description: IND vs WI: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात गुरुवारी वन-डे सीरिजमधील पहिली मॅच खेळली जाणार आहे. टी-20 सीरिजमध्ये वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिल्यानंतर आता टीम इंडिया वन-डे सीरिज जिंकण्यासाठी मैदानात उतरणार
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...