IND vs WI दुसरी वनडे: जाणून घ्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये कसे असेल हवामान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 10, 2019 | 20:56 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. जाणून घ्या कसे असेल हवामान

port of spain
पोर्ट ऑफ स्पेन 

थोडं पण कामाचं

  • भारत वि वेस्ट इंडिज दुसरी वनडे
  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय
  • पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळवला जाणार दुसरा सामना

पोर्ट ऑफ स्पेन: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी त्रिनिदाद आणि टोबॅगोची राजधानी पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. ३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर पावसाचे संकट आहे. तीन सामन्यांच्या टी-२० सीरिजवर याचा जास्त परिणाम झाला नाही आणि तीनही सामने पार पडले. भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-० या फरकाने खिशात घातली. मात्र यानंतर गुयानामध्ये खेळवण्यात आलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसाने खोडा घातला आणि १३ ओव्हरनंतर सामना रद्द करावा लागला. 

टॉस हरल्यानंतर यजमान वेस्ट इंडिजचा संघाने १ बाद ५४ धावा केल्या होत्या. भारतीय क्रिकेट चाहत्यांची नजर आता पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यावर आहे. सगळ्यांच्या मनात पावसाबद्दल संभ्रम असून अनेक सवाल उपस्थित होत आहेत. मात्र त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. रविवारी सामन्या दरम्यान अधिक वेळ हवामान साफ राहण्याची शक्यता आहे. हवामानाच्या अंदाजानुसार दोनही संघादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या सामन्यादरम्यान हवामान स्वच्छ राहील. कमाल तापमान ३१ डिग्री आणि किमान तापमान २५ डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. सामन्याच्या सुरूवातीला तीन तास पाऊस होण्याची २० टक्के शक्यता आहे. मात्र वेळेसोबतच यात घट होत ते ७ टक्के होण्याची शक्यता आहे. 

सामन्याच्या सुरूवातीला ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. यामुळे गोलंदाजांना फायदा मिळू शकतो. यातच दोन्ही संघापैकी जे कोणी टॉस जिंकतील तो संघ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.

पहिली वनडे रद्द

भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्याने हा सामना रद्द करण्यात आला. सामन्यात तीन वेळा पावसाचा व्यत्यय आला. तिसऱ्यांदा पाऊस आला तेव्हा वेस्ट इंडिजच्या संघाने १३ ओव्हरमध्ये एक बाद ५४ धावा केल्या.

भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या धिप्पाड कॉर्नवालचा समावेश

 २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघात साडे सहा फूट लांब आणि १४० किलो वजनाच्या रहकीम कॉर्नवालला स्थान देण्यात आले आहे. अँटिग्वामध्ये जन्मलेल्या कॉर्नवालची उंची ६.५ फूट आणि वजन १४० किलो इतके आहे. तो जगातील सर्वात विशाल क्रिकेटर मानला जातो. हा २६ वर्षीय ऑलराऊंडर क्रिकेटरने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
IND vs WI दुसरी वनडे: जाणून घ्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये कसे असेल हवामान Description: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. जाणून घ्या कसे असेल हवामान
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...