India vs West Indies 2nd ODI: विंडीजसमोर २८० धावांचे आव्हान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 11, 2019 | 23:39 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

India vs West Indies LIVE score, 2nd ODI: भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

india vs west indies
भारत वि वेस्ट इंडिज 

पोर्ट ऑफ स्पेन: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला सामने पावसामुळे रद्द झाल्याने दुसरा सामना चुरशीचा रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोनही संघ या सामन्यात विजय मिळवत आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करतील. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये हा सामना रंगत आहे. याआधी झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध निर्भेळ यश मिळवले होते.टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरूद्ध खेळताना तब्बल आठ वर्षानंतर त्यांच्याच मायभूमीत त्यांना हरवले होते. २०११मध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत १-० असा विजय मिळवला होतो. त्यामुळे या मालिकेतही वेस्ट इंडिजला धूळ चारण्यासाठी विराट सेना सज्ज झाली आहे. 

पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पहिल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ १३ ओव्हरचाच खेळ झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना १३ ओव्हरमध्ये एक बाद ५४ धावा केल्या होत्या. 

लाईव्ह अपडेट

 1. वेस्ट इंडिजसमोर २८० धावांचे आव्हान
 2. भारताच्या ५० षटकांत २७९ धावा
 3. श्रेयस अय्यर ७१ धावा करून बाद
 4. विराट कोहलीच्या १२० धावा
 5. विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण
 6. रिषभ पंत २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये
 7. भारताच्या १०१ धावांवर तिसरा गडी बाद
 8. भारताचे धावांचे शतक पूर्ण
 9. रोहित शर्मा १८ धावा करून तंबूत परतला
 10. १५.३ ओव्हरमध्ये रोहित शर्मा बाद
 11. तिसऱ्याच चेंडूवर भारताचा धवन २ धावा करून बाद
 12. पहिल्याच षटकात भारताला मोठा झटका
 13. भारताने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय
 14. भारत वि. वेस्ट इंडिज दुसरा सामना

संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (wk), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

वेस्टइंडीज: जेसन होल्डर (कॅप्टन), क्रिस गेल, जॉन कैंपबेल, इविन लुईस, शाई होप, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरन, रोस्टन चेस, फैबियन एलन, कार्लोस ब्रैथवेट, कीमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस, केमर रोच।

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
India vs West Indies 2nd ODI: विंडीजसमोर २८० धावांचे आव्हान Description: India vs West Indies LIVE score, 2nd ODI: भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...