IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात जुलैमध्ये धमाकेदार सीरीज, हे आहे पूर्ण वेळापत्रक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 02, 2022 | 13:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs WI: भारतीय क्रिकेट संघाला या वर्षी जोरदार क्रिकेट खेळायचे आहे. जुलैमध्ये भारत वेस्ट इंडिजचा दौरा करत आहे. सोबतच या दोन्ही देशांदरम्यान ३ सामन्यांची वनडे मालिका आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेची सुरूवात २२ जुलैला होत आहे. 

india vs west indies
भारत -वेस्ट इंडिजमध्ये धमाकेदार सीरिज, पाहा पूर्ण वेळापत्रक 
थोडं पण कामाचं
  • बीसीसीआय आणि क्रिकेट वेस्ट इंडिजने बुधवारी भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची घोषणा केली
  • यात २२ जुलैपासून ते ७ ऑगस्टपर्यंत दोन्ही संघादरम्यान तीन वनडे आणि पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत
  • वनडे मालिका आणि तीन टी-२० सामने त्रिनिददाद तसेच टोबॅगो आणि सेंट किट्स तसेच नेव्हिसमध्ये खेळवले जाणार आहे.

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ(indian cicket team) या वर्षी भरपूर क्रिकेट खेळणार आहे. जुलैमध्ये भारत वेस्ट इंडिजचा(india tour of west indies) दौरा करत आहे. येथे दोन्ही देशांदरम्यान ३ सामन्यांची वनडे मालिका(one day series) आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका(t-20 series) रंगणार आहे. या मालिकेची सुरूवात २२ जुलैपासून सुरू होणार आहे.

अधिक वाचा -  जूनचा महिना असणार खूप खास, या राशीतील लोकांना लागणार लॉटरी

भारत-वेस्ट इंडिजमध्ये जुलैमध्ये रंगणार मालिका

बीसीसीआय आणि क्रिकेट वेस्ट इंडिजने बुधवारी भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची घोषणा केली यात २२ जुलैपासून ते ७ ऑगस्टपर्यंत दोन्ही संघादरम्यान तीन वनडे आणि पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. भारत १७ जुलैला इंग्लंडला कसोटी संघाचा दौरा संपवणार आहे यात ज्या खेळाडूंची निवड होणारते सरळ इंग्लंडवरून वेस्ट इंडिजसाठी रवाना होतील. 

संपूर्ण मालिका फॅनकोडवर लाईव्ह स्ट्रीम केली जाणार

वनडे मालिका आणि तीन टी-२० सामने त्रिनिददाद तसेच टोबॅगो आणि सेंट किट्स तसेच नेव्हिसमध्ये खेळवले जाणार आहे. शेवटे दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने अमेरिकेच्या फ्लोरिडामधील फोर्ट लॉडरहिलमध्ये होणार. संपूर्ण मालिका फॅनकोडवर लाईव्ह स्ट्रीम केल जाणार आहे. वेस्ट इंडिजचा कर्णदार निकोलस पूरनने आगामी मालिकेबद्दल सांगितले, आमचा संघ तरूण आहे. जो वेस्ट इंडिजच्या टीमप्रमाणे क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. 

वनडे मालिका 

पहिली वनडे : 22 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन 
दुसरी वनडे : 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन 
तिसरी वनडे : 27 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

(सर्व सामने भारतीय वेळनुसार संध्याकाळी ७ वाजल्यापासून)

अधिक वाचा - एसटी महामंडळाचा वाहननामा, बसचे बदलते रुपडे

टी-२० मालिका

पहिली टी20: 29 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरी टी20 : 1 ऑगस्ट, सेंट किट्स तसेच नेविस
तिसरी टी20 : 2 ऑगस्ट, सेंट किट्स तसेच नेविस
चौथी टी20 : 6 ऑगस्ट, अमेरिकाचे फ्लोरिडा 
पाचवी टी20 : 7 ऑगस्ट, अमेरिकाचे फ्लोरिडा 

(सर्व सामने भारतीय वेळनुसार रात्री ८ वाजल्यापासून)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी