IND vs WI टी-२० सामन्याच्या वेळेत मोठा बदल, आता इतक्या वाजेपर्यंत जागे राहात पाहावी लागेल मॅच

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 02, 2022 | 15:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या तिसरा टी-२० सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून सुरू होणार नाही. हा सामना सुरू होण्याची वेळ बदलली आहे. 

india vs west indies
IND vs WI तिसरा टी-२० सामना या वेळेस होणार सुरू 
थोडं पण कामाचं
  • ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील ही दुसरी वेळ आहे की सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
  • दोन्ही संघादरम्यानच्या मालिकेतील दुसरा सामना वॉर्नर पार्क येथे खेळवण्यात आला होता.
  • हा सामनाही भारतीय वेळेनुसार ८ वाजता सुरू होणार होता मात्र या सामन्याची सुरूवात रात्री ११ वाजता झाली होती.

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज(india vs west indies) यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील(t-20 series) तिसरा सामना मंगळवारी खेळवला जात आहे. हा सामना सेंट् किट्सच्या वॉर्नर पार्कमध्ये(warner park) खेळवला जाईल. हा सामना रात्री ८ वाजल्यापासून खेळवण्यात येणार होता मात्र आता या सामन्याची सुरूवात भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ वाजल्यापासून होईल. १ ऑगस्टला खेळवण्या आलेल्या दुसऱ्या सामन्यातही वेळ बदलण्यात आली होती. india vs west indies third match timing change

अधिक वाचा - टेन्शन येतंय? मग चांगलंच आहे की!

बीसीसीआयने ट्वीट करत दिली ही माहिती

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्याच्या वेळेची माहिती बीसीसीआयने ट्वीट करत दिली आहे. बीसीसीआयने सांगितले की तिसऱ्या टी-२० सामन्याच्या टायमिंगमध्ये बदल झाला आहे. जुन्या वेळापत्रकानुसार हा सामना भारतीय वेळेनुसार ८ वाजता सुरू होणार होता मात्र आता टॉस ९ वाजता होईल आणि पहिला बॉल ९.३० वाजता फेकला जाईल.

दुसऱ्या सामन्यातही झाला होता हा बदल

५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील ही दुसरी वेळ आहे की सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दोन्ही संघादरम्यानच्या मालिकेतील दुसरा सामना वॉर्नर पार्क येथे खेळवण्यात आला होता. हा सामनाही भारतीय वेळेनुसार ८ वाजता सुरू होणार होता मात्र या सामन्याची सुरूवात रात्री ११ वाजता झाली होती. क्रिकेट वेस्ट इंडिजने प्रेस रिलीज करत सांगितले होते की टीमचे महत्त्वाचे ामना त्रिनिदाद येथून सेंट् किट्स येथे पोहोचण्यास उशीर झाल्याने सामना उशिराने सुरू झाला. 

अधिक वाचा - या 9 लोकांमध्ये असते ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता

मालिकेत १-१ अशी बरोबरी

५ सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यानंतर दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने ६८ धावांनी बाजी मारली होती. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने ५ विकेटनी विजय मिळवला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात ही आघाडी वाढवत प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी