India vs West Indies: आज अखेरच्या वन डे मध्ये सिरीज जिंकण्यासाठी उतरणार विराट ब्रिगेड, या आहेत खास गोष्टी 

धवन दुसऱ्या वन डे फक्त दोन धावा बनवू शकला होता, दुखापतीतून परतल्यावर त्याचे पुनर्रागमन चांगले झाले नाही. धवन आत येणाऱ्या चेंडूने हैराण आहे. त्याला दोनवेळा जलदगती गोलंदाज शेल्डन कोटरेलने बाद केले आहे. त्याला दोन

shikhar dhawan
शिखर धवन 

थोडं पण कामाचं

  • भारत वन डे सिरीजमध्ये १-० ने आघाडीवर आहे. 
  • शिखर धवन मोठी केळी खेळून आपल्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा अंत सुखद अंदाजात करू इच्छित आहे. 
  • भारतीय संघात चौथ्या स्थानासाठी श्रेयस अय्यर याने आपला दावा मजबूत केला आहे. 

पोर्ट ऑफ स्पेन :  सलामी फलंदाज शिखर धवन लोगोपाठा चार सामन्यात फेल गेल्यामुळे आता वेस्ट इंडिज विरूद्धच्या अंतीम वन डे सामन्यात मोठी खेळी खेळण्यास आतूर असणार आहे. भारत बुधवारी वेस्ट इंडिजविरूद्ध तिसऱा आणि अंतीम वन डे सामना जिंकून आणखी एक सिरीज आपल्या खिशात घालण्यासाठी उतरणार आहे. टी-२० सिरीजमध्ये एक, २३ आणि तीन धावांची खेळी केल्यानंत दुसऱ्या वन डेमध्ये केवळ दोन धावांवर धवन बाद झाला होता. दुखापतीतून परतल्यानंतर त्याने चांगली खेळी केलेली नाही. धवनला आत येणाऱ्या चेंडूमुळे अडचण होत आहे. त्याला दोन वेळा जलदगती गोलंदाज शेल्डन कोटरेलने बाद केले आहे. 

धवन टेस्ट टीममध्ये नाही आणि त्यामुळे ही त्याची कॅरेबियन दौऱ्यातील अखेरचा सामना असणार आहे.  त्यामुळे आपला हा दौरा तो आठवणीत राहावा असे करू इच्छित आहे. भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर आपली जागा पक्की करण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. यात श्रेयस अय्यर याने दुसऱ्या वन डेमध्ये शानदार अर्धशतकीय खेळी केल्यामुळे रिषभ पंतवर दबाव वाढविला आहे. पंतला टीम मॅनेजमेंट आणि विशेष करून कर्णधार विराट कोहलीचे समर्थन प्राप्त आहे. पण तो लागोपाठ अपयशी ठरल्याने आणि दुसऱ्या वन डे सामन्यात अय्यर याने ६८ चेंडू ७१ धावांची खेळी केल्याने गोष्टी बदलल्या आहेत. 

पंतची मानसिकता चिंतेचा विषय आहे. तो मौक्याची क्षणी आपली विकेट फेकतो. कोणताही संघ या ठिकाणी चांगला धैर्यवान फलंदाज उतवू इच्छित आहे. रविवारी खेळलेल्या खेळीत अय्यर याने आपला दावा मजबूत केला आहे. दुसऱ्या वन डे मध्ये १२५ चेंडूत १२० धावा खेळणाऱ्या कर्णधार  विराट कोहलीने आपला फॉर्म असाच कायम ठेवला पाहिजे. धवन, रोहित शर्मा आणि पंत लवकर बाद झाल्यावर कोहलीने अय्यरच्या साथीने डावाला आकार दिला. 

भुवनेश्वर कुमार ने गेल्या सामन्यात आठ षटकात ३१ धावा देत ४ विकेट पटकावल्या होत्या. भारतासाठी त्याने शानदार कामगिरी केली होती. त्याने हीच कामगिरी या दौऱ्याच्या आगामी सामन्यात करायला हवी. भुवनेश्वरचा जोडीदार मोहम्मद शमी याने ३९ धावा देऊन दोन विकेट आणि कुलदीप यादव याने ५९ धावा देत दोन विकेट पटावल्या होत्या. डावखुरा स्पीनर कुलदीप आता धावांच्या गतीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करणार आहे. 

विजय मिळविणाऱ्या संघात बदल न करण्याला टीम मॅनेजमेंट प्राधान्य देतो. पण कोहली अखेरच्या वन डे सामन्यात शमीला आराम देऊन नवदीप सैनीला संधी देऊ शकतो. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ हा सामना जिंकून सिरीज बरोबरीत सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताला पराभूत करण्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाला अधिक जबाबदारीने खेळणे गरजेचे आहे. टीम जवळ शाई होप, शिमरॉन हेटमायर आणि निकोलस पूरन सारखे प्रतिभावंत फलंदाज त्यांच्याकडे असून ते भारतीय संघासाठी दोनका बनू शकतात. 

एकदिवसीय सामन्यांनंतर दोन्ही संघ एन्टीगा येथील नॉर्थ साऊंडमध्ये २२ ऑगस्ट रोजी दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळणार आहे. 

संभाव्य संघ 

भारत:  विराट कोहली (कप्तान), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद और नवदीप सैनी. 

वेस्टइंडीज:  जेसन होल्डर (कप्तान), क्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, ऐविन लुईस, शाई होप, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, रोस्टन चेज, फॅबियन एलेन, कार्लोस ब्रॅथवेट, कीमो पॉल, शेल्डन कोटरेल, ओशाने थॉमस और केमार रोच.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
India vs West Indies: आज अखेरच्या वन डे मध्ये सिरीज जिंकण्यासाठी उतरणार विराट ब्रिगेड, या आहेत खास गोष्टी  Description: धवन दुसऱ्या वन डे फक्त दोन धावा बनवू शकला होता, दुखापतीतून परतल्यावर त्याचे पुनर्रागमन चांगले झाले नाही. धवन आत येणाऱ्या चेंडूने हैराण आहे. त्याला दोनवेळा जलदगती गोलंदाज शेल्डन कोटरेलने बाद केले आहे. त्याला दोन
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...