रोहित शर्मा, विराट कोहली आणि कुलदीप यादव तिसऱ्या वन डेमध्ये तोडू शकतात हे खास रेकॉर्ड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 14, 2019 | 14:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ind vs WI, 3rd ODI: 'हिटमॅन' ने २६ धावा या तिसऱ्या वन डे सामन्यात केल्या तर भारताचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंह याला मागे टाकणार आहे. 

rohit sharma
रोहित शर्मा  

थोडं पण कामाचं

  • तिसऱ्या वन डे सामन्यात २६ धावा केल्यावर रोहित शर्मा टाकणार युवराज सिंगला मागे
  • कोहलीही वन डे मधील मोठा विक्रम तोडण्याचा तयारीत 
  • कुलदीप यादवकडे सर्वात फास्ट १०० विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनण्याची संधी आहे. 

पोर्ट ऑफ स्पेन :  टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माला बुधवारी वेस्ट इंडिज विरूद्ध तिसऱ्या आणि अंतीम वन डेमध्ये इतिहास रचण्याची संधी आहे. रोहित वन डे मध्ये सर्वाधिक धावा बनविण्याच्या बाबतीत सातव्या स्थानावर आहे. हिटमॅन ला आता केवळ २६ धावांची गरज आहे. त्याने तिसऱ्या वन डेत या २६ धावा केल्या तर तो भारताचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंगला मागे टाकणार आहे. युवराज सिंग याच्या ३०४ वन डे सामन्यात ८ हजार ७०१ धावा आहे. तर रोहित याने २१७ सामन्यात ८ हजार ६७६ धावा बनविल्या आहेत. युवराज सिंह याने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

भारताकडून वन डेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये रोहित शर्माच्या पुढे सचिन तेंडुलकर (१८४२६) विराट कोहली (११४०६), सौरव गांगुली (११३६३), राहुल द्रविड (१०८८९), एमएस धोनी (१०७७३) मोहम्मद अझरुद्दीन (९३७८) आणि युवराज सिंह (८७०१) आहेत. युवीने भारताकडून ८६०९ धावा केल्या आहेत. तर आशिया इलेवनकडून ९२ धावा केल्या आहेत. रोहित शर्माची दुसऱ्या वन डेमध्ये कामगिरी चांगली राहिली नाही. तो आता तिसऱ्या वन डेमध्ये आपल्या कामगिरीत सुधार करून मोठी खेळी खेळू इच्छित आहे. 

भारतीय उपकर्णधाराने दुसऱ्या वन डेमध्ये केवळ १८ धावा केल्या होत्या. आता तो तिसऱ्या वन डेमध्ये चांगली खेळी खेळण्याची आशा करत आहे. मुंबईच्या या फलंदाजाने इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केली होती आणि पाच शतक झळकावले होते. वेस्ट इंडिज विरूद्ध दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीने डाव सावरत आपल्या वन डे करिअरमधीय ४२ वे शतक झळकावले. टीम इंडियाने डकवर्थ लुईस मेथर्डने वेस्ट इंडिजवर ५९ धावांनी मात केली होती. 

काय कोहली तोडणार या दिग्गज कॅरेबियन फलंदाजाचा विक्रम?  

भारतीय कर्णधार विराट कोहली रविवारी माजी कर्णधार सौरव गांगुली याचा विक्रम तोडला. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला. आता तिसऱ्या वन डे सामन्यात विराटकडे आणखी एक मोठा विक्रम तोडण्याची संधी आहे. 

कोहली वेस्ट इंडिजच्या जमीनावर भारत-वेस्ट इंडिज सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो. त्यासाठी त्याला २५ धावांची गरज आहे. जर त्याने असे केले तर वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज रामनरेश सरवनला मागे टाकू शकतो. कोहलीने १४ सामन्यात ६१.४५ च्या सरासरीने ६७६ धावा केल्या आहे. या दरम्यान त्याने कॅरेबियन जमीनीवर तीन शतक झळकावले आहे. रामनरेश सारवन याने ७०० धावा केल्या आहेत. त्याला मागे टाकण्यावर कोहलीचे लक्ष्य असणार आहे. 

कुलदीपकडे शमीचा विक्रम तोडण्याची संधी 

तर दुसरीकडे चायनामन कुलदीप यादवर यांच्याकडे सर्वात जलद १०० विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. कुलदीप ही कामगिरी करण्याचा चार विकेट दूर आहे. कुलदीपने ५३ वनडे मध्ये ९६ विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. तर मोहम्मद शमी याने ५६ वन डे सामन्यात विकेटचे शतक पूर्ण केले आहे. कुलदीपकडे शमीचा विक्रम तोडण्याची आज चांगली संधी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
रोहित शर्मा, विराट कोहली आणि कुलदीप यादव तिसऱ्या वन डेमध्ये तोडू शकतात हे खास रेकॉर्ड Description: Ind vs WI, 3rd ODI: 'हिटमॅन' ने २६ धावा या तिसऱ्या वन डे सामन्यात केल्या तर भारताचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंह याला मागे टाकणार आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...