IND vs SA: टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारतच असणार बॉस; पाहा आकडे

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 08, 2022 | 15:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SA T20 Series | भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

India will be the boss in T20 cricket against South Africa, See Records
टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारतच असणार बॉस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे.
  • भारताने आपला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
  • भारतीय संघ के.एल राहुलच्या नेतृत्वात असणार आहे.

IND vs SA T20 Series | मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्मासह अनेक स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत रिगंणात असलेल्या भारतीय संघाला आपला टी-२० विक्रम कायम ठेवण्याचे आव्हान असेल. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाने सलग १२ टी-२० सामने जिंकले आहेत आणि सलग १३ टी-२० सामने जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. के.एल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघासमोर विजयी सुरुवात करण्याचे आव्हान असेल. (India will be the boss in T20 cricket against South Africa, See Records). 

अधिक वाचा : पब्जी खेळायला नकार दिला म्हणून आईवर झाडल्या गोळ्या

आफ्रिकेविरूद्ध टी-२० मालिकेत भारताचे वर्चस्व

भारताने आपला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने अनेकवेळा दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १५ टी-२० सामने खेळले गेले आहेत, ज्यामधील भारताने ९ आणि दक्षिण आफ्रिकेने ६ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दोन्ही देशांमधील एकही सामना आतापर्यंत बरोबरीचा राहिला नाही. या मालिकेतही भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व असेल असे या आकडेवारीवरून दिसून येते.

टी-२० मालिका जिंकण्यात भारत आफ्रिकेच्या पुढे

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ६ वेळा टी-२० मालिका खेळली गेली आहे. त्यात एका सामन्यापासून तीन सामन्यांच्या मालिकांचा समावेश आहे. भारताने आतापर्यंत २००६-०७, २०१०-११ आणि २०१७-१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा टी-२० मालिकेत पराभव केला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने २०११-१२ आणि २०१५-१६ मध्ये भारताविरुद्ध टी-२० मालिका जिंकली आहे. २०१९-२० मध्ये दोन्ही देशांदरम्यान खेळलेली टी-२० मालिका अनिर्णित राहिली होती. दरम्यान आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्यांदाच ५ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे.

मोठे लक्ष्य गाठण्यात आफ्रिकेचा पलडा भारी

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यंत भारताविरुद्धच्या टी-२० सामन्यात दोनदा २०० हून अधिक धावा केल्या आहेत. ३० मार्च २०१२ रोजी जोहान्सबर्ग येथे त्यांच्या संघाने प्रथमच ४ बाद २१९ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्यांदा २ ऑक्टोबर २०१५ रोजी धर्मशाला येथे ३ बळींच्या नुकसानात २०० धावा केल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी