India vs England : सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर भारताचा विजय नक्की! हे आहे सगळ्यात मोठे कारण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 07, 2022 | 11:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup 2022: टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप 2022 ची ट्रॉफी जिंकण्यापासून केवळ दोन पावले दूर आहे. खरंतर, भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2022मधील दुसरा सेमीफायनलचा सामना गुरूवारी 10 नोव्हेंबरला अॅडलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. 

team india
सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर भारताचा विजय नक्की! 
थोडं पण कामाचं
  • जर टीम इंडिया या सामन्यात इंग्लंड संघाला धूळ चारण्यात यशस्वी ठरत असेल तर ते फायनलमध्ये एंट्री करतील.
  • ज्या फॉर्ममध्ये टीम इंडिया आहे ते पाहता टी20 वर्ल्ड कप 2022 ची ट्रॉफी त्यांच्यापासून खूप दूर नाही.
  • जर असे घडले तर भारत 15 वर्षांनी टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी आपल्या नावावर करेल.

मुंबई: टीम इंडिया(team india) टी20 वर्ल्ड कप 2022चा(t20 world cup 2022) खिताब जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. खरंतर, भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2022चा दुसरा सेमीफायनल(semifinal) साना गुरूवारी 10 नोव्हेंबरला अॅडलेडच्या() ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. सेमीफायनल सामन्यात भारत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजयासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. india will definately win against england in T20WC2022

अधिक वाचा - तुमचा मेंदू म्हातारा होतोय का?

इंग्लंडला हरवून फायनलमध्ये पोहोचणार भारत

जर टीम इंडिया या सामन्यात इंग्लंड संघाला धूळ चारण्यात यशस्वी ठरत असेल तर ते फायनलमध्ये एंट्री करतील. ज्या फॉर्ममध्ये टीम इंडिया आहे ते पाहता टी20 वर्ल्ड कप 2022 ची ट्रॉफी त्यांच्यापासून खूप दूर नाही. जर असे घडले तर भारत 15 वर्षांनी टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी आपल्या नावावर करेल. याआधी 2007 मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टी20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती. 

सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा टीम इंडियावर पक्का विजय

टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. टी20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटबाबत विचार केला असता भारताचा इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड चांगला राहिला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये 22 सामने झाले यात 12 सामने टीम इंडियाने जिंकले तर 10 सामने इंग्लंड संघाने जिंकले. 

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे पारडे जड

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामने खेळवण्यात आले. यात टीम इंडियाने 2 सामने जिंकले तर एक सामना इंग्लंड संघाने जिंकला. अखेरच्या वेळेस भारत आणि इंग्लंड टी20 वर्ल्ड कपचा सामना 2012मध्ये खेळवण्यात आला होता. श्रीलंकेत खेळवण्यात आलेल्या टी20 वर्ल्ड कप 2012मधील या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला 90 धावांनी हरवले होते. 

अधिक वाचा - थंडीत खोकला टाळण्यासाठी DIY टिप्स, होईल फायदा

कोणीच विसरू शकत नाही ही कामगिरी

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना 2007 मध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने 18 धावांनी विजय मिळवला होता. हा तोच सामना आहे ज्यात टीम इंडियाच्या धुरंधर क्रिकेटर युवराज सिंहने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या 6 बॉलवर 6 सिक्स मारले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी