IND vs WI 2nd ODI : सलग दुसऱ्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत थरार कायम, अक्षर पटेलची कमाल कामगिरी, भारताचा विक्रम

IND vs WI 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सलग दुसऱ्या वन डे मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत थरार कायम राहिला. पहिली मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगली आणि भारताने तीन धावांनी विजय मिळवला तर दुसऱ्या मॅचमध्ये ४९.४ ओव्हर खेळून भारताने २ विकेट राखून विजय मिळवला.

Axar Patel
अक्षरची अप्रतिम कामगिरी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सलग दुसऱ्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत थरार कायम
  • अक्षर पटेलची कमाल कामगिरी
  • भारताचा विक्रम

IND vs WI 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सलग दुसऱ्या वन डे मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत थरार कायम राहिला. पहिली मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगली आणि भारताने तीन धावांनी विजय मिळवला तर दुसऱ्या मॅचमध्ये ४९.४ ओव्हर खेळून भारताने २ विकेट राखून विजय मिळवला. भारताने विंडीज विरुद्धची तीन वन डे मॅचची सीरिज पहिल्या दोन विजयांसह जिंकली.

IND vs WI: शेवटच्या क्षणापर्यंत रोखला होता श्वास, मग घडलं असं काहीसं

IND vs WI 1st ODI : धवनचे हुकलेले शतक आणि अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेला थरार

IND vs WI : भारताने वेस्ट इंडिजसमोर ठेवले 309 धावांचे लक्ष्य, धवन-गिल आणि अय्यरचे अर्धशतक

पहिल्या मॅचमध्ये भारताचा कॅप्टन शिखर धवन (९७ धावा) आणि दुसऱ्या मॅचमध्ये अक्षर पटेल मॅन ऑफ द मॅच झाला. अक्षरने दुसऱ्या मॅचमध्ये नाबाद ६४ धावा केल्या. याआधी बॉलिंग करताना त्याने विंडीजच्या एस. ब्रूक्सला शिखर धवनकरवी झेलबाद केले.

Siraj last over: सामना सुपर ओव्हरच्या दिशेने जात होता, सिराजच्या अचूक यॉर्कर्सने भारताचा बचाव केला

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या घरी दुसर्‍यांदा कुणीतरी येणार, पत्नी राधिकाने शेअर केला गोड फोटो

Arjun and Sara Tendulkar: अर्जुन-सारा तेंडुलकर बनले मुन्नाभाई-सर्किट, पाहा त्यांचे फोटोज

अक्षरची अप्रतिम कामगिरी

अक्षर पटेलने कमाल केली. बॉलिंग करताना त्याने विंडीजच्या एस. ब्रूक्सला शिखर धवनकरवी झेलबाद केले. ब्रूक्सने ३६ बॉल खेळून पाच फोर मारत ३५ धावा केल्या होत्या. यामुळे त्याची विकेट भारतासाठी हिताची ठरली. यानंतर बॅटिंग करताना अक्षर पटेलने ३५ बॉल खेळून पाच सिक्स आणि तीन फोर मारत नाबाद ६४ धावा केल्या. अक्षर पटेल १८२.८६ या स्ट्राईक रेटने खेळला. त्याच्या वेगवान खेळीमुळे भारताला विजय मिळवणे शक्य झाले. 

अक्षरने विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या वन डे मध्ये बॅटिंग करताना केलेली कामगिरी ही त्याची सर्वोच्च कामगिरी ठरली. वन डे क्रिकेटमध्ये अक्षरने ४० मॅचमध्ये २२ वेळा बॅटिंग केली. तो सात वेळा नाबाद राहिला. त्याने वन डे मध्ये आतापर्यंत २६६ धावा केल्या. अक्षरच्या नावावर वन डे मध्ये एक हाफ सेंच्युरी (अर्धशतक), १२ फोर (चौकार) आणि १४ सिक्स (षटकार) यांचा समावेश आहे.

वन डे क्रिकेटमध्ये अक्षरने ४० मॅचमधून ३७ वेळा बॉलिंग केली. त्याने २ हजार ४ बॉल टाकून १४९२ धावा देत ४६ विकेट घेतल्या. ३४ धावा देत ३ विकेट ही अक्षर पटेलची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

भारताची विक्रमी कामगिरी

वेस्‍ट इंडिज विरोधात भारताने सलग बाराव्यांदा सीरिज जिंकली. या विजयासह भारताने सलग सर्वाधिक सीरिजमध्ये एका टीमला पराभूत करण्याचा नवा विक्रम केला. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तानने झिम्बाब्वेचा सलग ११ सीरिजमध्ये पराभव केला होता.

दुसऱ्या वन डे मॅच मध्ये काय घडले?

वेस्ट इंडिजमध्ये त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी वन डे झाली. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेणाऱ्या वेस्ट इंडिजने ५० ओव्हरमध्ये ६ बाद ३११ धावा केल्या. भारताने ४९.४ ओव्हरमध्ये ८ बाद ३१२ धावा केल्या. 

धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताकडून कॅप्टन असलेल्या शिखर धवनने १३ धावा, शुभमन गिलने ४३ धावा, श्रेयस अय्यरने ६३ धावा, सुर्यकुमार यादवने ९ धावा, विकेटकीपर असलेल्या संजु सॅमसनने (धावचीत) ५४ धावा, दीपक हूडाने ३३ धावा, अक्षर पटेलने नाबाद ६४ धावा, शार्दुल ठाकुरने ३ धावा, आवेश खानने १० धावा, मोहम्मद सिराजने नाबाद १ धाव असे योगदान दिले. भारताला १९ अवांतर (एक्स्ट्रॉ) मिळाले. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ आणि के. मेयर्सने प्रत्येकी २ तर जे. सील्स, आर. शेफर्ड आणि अकील होसेन या तिघांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

याआधी विंडीजकडून विकेटकीपर असलेल्या शाई होपने ११५, के. मेयर्सने ३९, एस. ब्रूक्सने ३५, ब्रँडन किंगने शून्य, कॅप्टन असलेल्या निकोलस पूरनने ७४, आर. पॉव्हेलने १३, आर. शेफर्डने १५, अकील होसेनने नाबाद ६ धावा केल्या. विंडीजला १४ अवांतर (एक्स्ट्रॉ) मिळाल्या. भारताकडून शार्दुल ठाकुरने ३ तर अक्षर पटेल, दीपक हूडा आणि युझवेंद्र चहल या तिघांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

शाई होपची कमाल

शाई होप आपल्या १००व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा जगातील दहावा फलंदाज ठरला. त्याच्या आधी गॉर्डन ग्रीनिज, ख्रिस केनर्स, मोहम्मद युसूफ, कुमार संघकारा, ख्रिस गेल, मार्कस ट्रेस्कोथिक, रामनरेश सरवन, डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांनी हा पराक्रम केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी