भारताचा विजयाने शुभारंभ

India won by 5 wkts against New Zealand in 1st T20 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या तीन टी २० मॅचच्या मालिकेतील पहिली मॅच भारताने जिंकली. जयपूरमध्ये झालेली ही मॅच भारताने पाच विकेट राखून जिंकली.

India won by 5 wkts against New Zealand in 1st T20
भारताचा विजयाने शुभारंभ 
थोडं पण कामाचं
  • भारताचा विजयाने शुभारंभ
  • जयपूरमध्ये झालेली मॅच भारताने पाच विकेट राखून जिंकली
  • न्यूझीलंडने २० ओव्हरमध्ये ६ बाद १६४ धावा तर भारताने १९.४ ओव्हरमध्ये ५ बाद १६६ धावा केल्या

India won by 5 wkts against New Zealand in 1st T20 । जयपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या तीन टी २० मॅचच्या मालिकेतील पहिली मॅच भारताने जिंकली. जयपूरमध्ये झालेली ही मॅच भारताने पाच विकेट राखून जिंकली. विजयाने शुभारंभ करत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. 

याआधी भारताने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने २० ओव्हरमध्ये ६ बाद १६४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने १९.४ ओव्हरमध्ये ५ बाद १६६ धावा केल्या आणि मॅच जिंकली.

न्यूझीलंडकडून मार्टिन गुप्टीलने ७०, डेरिल मिचेलने शून्य, मार्क चॅपमनने ६३, ग्लेन फिलिप्सने शून्य, टिम सेफर्टने १२, रचिन रवींद्रने ७, मिचेल सेंटनरने नाबाद ४, टिम साउथीने नाबाद शून्य धावा केल्या. भारताकडून आर. अश्विन आणि भुवनेश्वरकुमारने प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराज आणि दीपक चहरने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

भारताकडून केएल राहुलने १५, कॅप्टन असलेल्या रोहित शर्माने ४८, सुर्यकुमार यादवने ६२, रिषभ पंतने नाबाद १७, श्रेयस अय्यरने ५, वेंकटेश अय्यरने ४, अक्षर पटेलने नाबाद १ धाव अशी कामगिरी केली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने २ तर मिचेल सेंटनर, टिम साउथी आणि डेरिल मिचेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

मॅन ऑफ द मॅच - सुर्यकुमार यादव

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक

  1. बुधवार १७ नोव्हेंबर २०२१ - पहिली टी २०, जयपूर - संध्याकाळी ७ वा. - भारत ५ विकेट राखून विजयी
  2. शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१ - दुसरी टी २०, रांची - संध्याकाळी ७ वा.
  3. रविवार २१ नोव्हेंबर २०२१ - तिसरी टी २०, कोलकाता - संध्याकाळी ७ वा.
  4. गुरुवार २५ नोव्हेंबर ते सोमवार २९ नोव्हेंबर २०२१ - पहिली टेस्ट, कानपूर - सकाळी ९.३० वा.
  5. शुक्रवार ३ डिसेंबर ते मंगळवार ७ डिसेंबर २०२१ - दुसरी टेस्ट, मुंबई - सकाळी ९.३० वा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी