IND vs ENG 1st T20 : भारताचा दणदणीत विजय, इंग्लंडची दाणादाण

India won by 50 runs against England in first T 20 Cricket Match : भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या तीन टी २० मॅचच्या सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.

India won by 50 runs against England in first T 20 Cricket Match
IND vs ENG 1st T20 : भारताचा दणदणीत विजय, इंग्लंडची दाणादाण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • IND vs ENG 1st T20 : भारताचा दणदणीत विजय, इंग्लंडची दाणादाण
  • भारताने पहिली टी २० मॅच ५० धावांनी जिंकली
  • हार्दिक पांड्या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच

India won by 50 runs against England in first T 20 Cricket Match : भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या तीन टी २० मॅचच्या सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला. या मॅचमध्ये भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडची दाणादाण उडाली. साउथम्पटन येथील द रोझ बाउलमध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताने बॅटिंगचा निर्णय घेतला आणि २० ओव्हरमध्ये ८ बाद १९८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला १९.३ ओव्हरमध्ये सर्वबाद १४८ धावा एवढीच मजल मारता आली. भारताने पहिली टी २० मॅच ५० धावांनी जिंकली. हार्दिक पांड्या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच झाला. त्याने ५१ धावा केल्या तसेच इंग्लंडच्या ४ बॅटरना बाद केले.

संक्षिप्त धावफलक : भारत : २० ओव्हरमध्ये ८ बाद १९८ धावा. रोहित शर्मा (२४ धावा), ईशान किशन (८ धावा), दीपक हूडा (३३ धावा), सुर्यकुमार यादव (३९ धावा), हार्दिक पांड्या (५१ धावा), अक्षर पटेल (१७ धावा), दिनेश कार्तिक (विकेटकीपर) (११ धावा), हर्षल पटेल (३ धावा, धावचीत), भुवनेश्वर कुमार (नाबाद १ धावा), अर्शदीप सिंह (नाबाद २ धावा), अवांतर (९). इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन आणि मोईन अली प्रत्येकी २ तर आर. टोप्ले, मॅथ्यू पार्किनसन्स आणि टी. मिल्स प्रत्येकी १ विकेट.

इंग्लंड : १९.३ ओव्हरमध्ये सर्वबाद १४८ धावा. जेसन रॉय (४ धावा), जोस बटलर (शून्य धावा), डेव्हिड मालन (२१ धावा), लियाम लिव्हिंगस्टोन (शून्य धावा), हॅरी ब्रूक (२८ धावा), मोईन अली (३६ धावा), सॅम करण (४ धावा), ख्रिस जॉर्डन (२६ धावा), टी. मिल्स (७ धावा), आर. टोप्ले (९ धावा), मॅथ्यू पार्किनसन्स (शून्य धावा). भारताकडून हार्दिक पांड्या ४ तर अर्शदीप सिंह आणि युझवेंद्र चहल प्रत्येकी २ विकेट तसेच भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल प्रत्येकी १ विकेट.

रोहित शर्माच्या नेतृत्वात सलग तेरावा विजय

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने टी २० क्रिकेटमध्ये सलग तेरावा विजय मिळवला. तसेच कर्णधार म्हणून रोहित शर्माने टी २० क्रिकेटमध्ये एक हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. ही कामगिरी त्याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी २०  मॅच दरम्यान साधली. रोहित भारताचे नेतृत्व करत २९ मॅचमध्ये एक हजार धावा केल्या. याआधी विराट कोहलीने भारताचे नेतृत्व करत ३० मॅचमध्ये एक हजार धावा केल्या.

रोहित शर्माचा अनोखा विक्रम

संघाचे नेतृत्व करत १५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने एक हजार धावा करणारा टी २० क्रिकेटमधील पहिला कॅप्टन होण्याचा मान रोहित शर्माने मिळवला.

टी २० मध्ये भारताचे नेतृत्व करत एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त धावा

  1. महेंद्रसिंह धोनी १५७० धावा
  2. विराट कोहली १११२ धावा
  3. रोहित शर्मा १००० धावा

टी २० मध्ये नेतृत्व करत एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त धावा

  1. बाबर आझम (पाकिस्तान) २६ मॅचमध्ये हजाराचा टप्पा
  2. रोहित शर्मा (भारत) २९ मॅचमध्ये हजाराचा टप्पा
  3. विराट कोहली (भारत) ३० मॅचमध्ये हजाराचा टप्पा
  4. फाफ डु प्लेसिस (द. आफ्रिका) ३१ मॅचमध्ये हजाराचा टप्पा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी