T 20 World Cup भारताचा पहिला विजय, रोहित चमकला

India won by 66 runs against Afghanistan at Abu Dhabi टी २० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सुपर १२ फेरीतील ग्रुप २ च्या मॅचमध्ये भारताचा ६६ धावांनी विजय झाला. अफगाणिस्तानचा पराभव करुन भारताने स्पर्धेतील टीमच्या पहिल्या विजयाची नोंद केली.

India won by 66 runs against Afghanistan at Abu Dhabi
T 20 World Cup भारताचा पहिला विजय, रोहित चमकला 
थोडं पण कामाचं
  • T 20 World Cup भारताचा पहिला विजय, रोहित चमकला
  • भारताचा ६६ धावांनी विजय
  • भारताने स्पर्धेतील टीमच्या पहिल्या विजयाची नोंद केली

India won by 66 runs against Afghanistan at Abu Dhabi ।  अबुधाबी: टी २० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सुपर १२ फेरीतील ग्रुप २ च्या मॅचमध्ये भारताचा ६६ धावांनी विजय झाला. अफगाणिस्तानचा पराभव करुन भारताने स्पर्धेतील टीमच्या पहिल्या विजयाची नोंद केली. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय अफगाणिस्तानला भोवला.

प्रथम फलंदाजी करत भारताने वीस ओव्हरमध्ये दोन बाद २१० धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने वीस ओव्हरमध्ये सात बाद १४४ धावा केल्या. या मॅचमध्ये १५७च्या स्ट्राईक रेटने ४७ बॉल खेळून आठ फोर आणि तीन सिक्सर मारत ७४ धावांची खेळी करणारा रोहित शर्मा मॅन ऑफ द मॅच झाला. रोहितचे हे आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधील २३वे अर्धशतक आहे.

भारताकडून केएल राहुलने ६९, रोहित शर्माने ७४, रिषभ पंतने नाबाद २७, हार्दिक पांड्याने नाबाद ३५ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या बी गुलबदीनने केएल राहुलला क्लीनबोल्ड केले तर करीम जनताने रोहित शर्माला मोहम्मद नबीकरवी झेलबाद केले.

 अफगाणिस्तानकडून हझरतुल्लाह झझईने १३, मोहम्मद शहजादने शून्य, रहमानुल्लाह गुरबाझीने १९, गुलबदीन नाइबोने १८, नजीबुल्लाह झदरानने ११, कॅप्टन असलेल्या मोहम्मद नबीने ३५, करीम जनताने नाबाद ४२, राशिद खानने शून्य, शराफुद्दीन अशरफीने नाबाद २ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने ३, रविचंद्रन अश्विनने २ तर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ग्रुप २ मध्ये असलेल्या भारताचा पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाला होता. मात्र अफगाणिस्तानविरुद्धची मॅच जिंकून भारताने स्पर्धेतील टीमच्या पहिल्या विजयाची नोंद केली. भारताला आता स्कॉटलंड आणि नामिबिया या दोन्ही देशांविरुद्धच्या मॅच मोठ्या फरकाने जिंकाव्या लागतील. तसेच अफगाणिस्तानने न्यूझीलंड विरुद्धची मॅच जिंकावी यासाठी प्रार्थना करावी लागेल. हा चमत्कार झाला तरच उत्तम रनरेटच्या (सरस धावगती) जोरावर भारत सेमी फायनल राउंडमध्ये (उपांत्य फेरी) दाखल होऊ शकेल. नाही तर भारताचे आव्हान सुपर १२ फेरीत संपेल.

भारताची स्कॉटलंड विरुद्धची मॅच शुक्रवार ५ नोव्हेंबर २०२१ आणि नामिबिया विरुद्धची मॅच सोमवार ८ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे. तर न्यूझीलंड-अफगाणिस्तान ही मॅच रविवार ७ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.

रोहित शर्मा विक्रमापासून तीन पावलं दूर

आयसीसीच्या मर्यादीत ओव्हरच्या स्पर्धांमध्ये टी २० वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तीन स्पर्धांचा समावेश होतो. आतापर्यंत आयसीसीच्या स्पर्धांमध्ये ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी करणाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे दोन भारतीय क्रिकेटपटू आघाडीवर आहेत. त्यांनी प्रत्येकी २३ वेळा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी केली. रोहित शर्माने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी २१ वेळा केली आहे. यामुळे तो विक्रमापासून तीन पावलं दूर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी