भारताने मारली बाजी, मालिका २-० ने जिंकली

India won by 7 wkts against New Zealand in 2nd T20 and won series भारताने न्यूझीलंड विरुद्धची दुसरी टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. सलग दुसऱ्या विजयामुळे भारताने न्यूझीलंड विरुद्धची तीन टी २० मॅचची सीरिज (तीन सामन्यांची मालिका) २-० अशी जिंकली.

India won by 7 wkts against New Zealand in 2nd T20 and won series
भारताने मारली बाजी, मालिका २-० ने जिंकली 
थोडं पण कामाचं
  • भारताने मारली बाजी, मालिका २-० ने जिंकली
  • दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा हर्षल पटेल मॅन ऑफ द मॅच
  • हर्षल पटेलने पदार्पणातच न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना बाद केले. 

India won by 7 wkts against New Zealand in 2nd T20 and won series रांची: भारताने न्यूझीलंड विरुद्धची दुसरी टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. याआधी भारताने न्यूझीलंड विरुद्धची पहिली टी २० मॅच पाच विकेट राखून जिंकली होती. सलग दुसऱ्या विजयामुळे भारताने न्यूझीलंड विरुद्धची तीन टी २० मॅचची सीरिज (तीन सामन्यांची मालिका) २-० अशी जिंकली. दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा हर्षल पटेल मॅन ऑफ द मॅच झाला. त्याने पदार्पणातच न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना बाद केले. 

झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरी टी २० मॅच झाली. या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने २० ओव्हरमध्ये ६ बाद १५३ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने १७.२ ओव्हरमध्ये ३ बाद १५५ धावा केल्या. 

न्यूझीलंडकडून मार्टिन गुप्टिलने ३१, डेरिल मिचेलने ३१, मार्क चॅम्पमनने २१, ग्लेन फिलिप्सने ३४, टिम सेफर्टने १३, जेम्स नीशामने ३, मिचेल सँटनेरने नाबाद ८, अॅडम मिलनेने नाबाद ५ धावा केल्या. भारताकडून नवोदीत हर्षल पटेलने पदार्पणाताच दोन विकेट घेतल्या. आर. अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

भारताच्या सलामीच्या जोडीने शतकी भागीदारी केली. केएल राहुलने सर्वाधिक ६५ धावा केल्या. त्याने ४९ चेंडूत दोन षटकार आणि सहा चौकार मारत ही कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्माने ३६ चेंडूत एक चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ५५ धावा केल्या. वेंकटेश अय्यरने नाबाद १२ धावा केल्या. सुर्यकुमार यादव एक धाव करुन परतला पण रिषभ पंतने सहा चेंडूत दोन षटकारांच्या जोरावर नाबाद १२ धावा केल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार असलेल्या टिम साउथीने भारताच्या तीन फलंदाजांना बाद केले.

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक

  1. बुधवार १७ नोव्हेंबर २०२१ - पहिली टी २०, जयपूर - संध्याकाळी ७ वा. - भारत ५ विकेट राखून विजयी
  2. शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१ - दुसरी टी २०, रांची - संध्याकाळी ७ वा. - भारत ७ विकेट राखून विजयी
  3. रविवार २१ नोव्हेंबर २०२१ - तिसरी टी २०, कोलकाता - संध्याकाळी ७ वा.
  4. गुरुवार २५ नोव्हेंबर ते सोमवार २९ नोव्हेंबर २०२१ - पहिली टेस्ट, कानपूर - सकाळी ९.३० वा.
  5. शुक्रवार ३ डिसेंबर ते मंगळवार ७ डिसेंबर २०२१ - दुसरी टेस्ट, मुंबई - सकाळी ९.३० वा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी