भारताने न्यूझीलंड विरुद्धची मालिका ३-०ने जिंकली

India won by 73 runs against New Zealand in 3rd T20 and won series 3-0 भारताने न्यूझीलंड विरुद्ध कोलकातामध्ये झालेली तिसरी टी २० मॅच ७३ धावांनी जिंकली. या विजयासह भारताने न्यूझीलंड विरुद्धची तीन टी २० मॅचची सीरिज (तीन सामन्यांची मालिका) ३-० अशी जिंकली.

India won by 73 runs against New Zealand in 3rd T20 and won series 3-0
India won by 73 runs against New Zealand in 3rd T20 and won series 3-0 
थोडं पण कामाचं
  • भारताने न्यूझीलंड विरुद्धची मालिका ३-०ने जिंकली
  • भारताने कोलकातामध्ये झालेली तिसरी टी २० मॅच ७३ धावांनी जिंकली
  • पहिली मॅच पाच विकेट राखून आणि दुसरी मॅच सात विकेट राखून भारताने जिंकली

India won by 73 runs against New Zealand in 3rd T20 and won series 3-0 कोलकाता:  भारताने न्यूझीलंड विरुद्ध कोलकातामध्ये झालेली तिसरी टी २० मॅच ७३ धावांनी जिंकली. या विजयासह भारताने न्यूझीलंड विरुद्धची तीन टी २० मॅचची सीरिज (तीन सामन्यांची मालिका) ३-० अशी जिंकली. पहिली मॅच पाच विकेट राखून आणि दुसरी मॅच सात विकेट राखून भारताने जिंकली होती.

तिसऱ्या मॅचमध्ये तीन ओव्हरमध्ये नऊ धावा देत न्यूझीलंडच्या डेरिल मिचेल, मार्क चॅम्पमन आणि ग्लेन फिलिप्स या तिघांना बाद करणारा अक्षर पटेल मॅन ऑफ द मॅच झाला. संपूर्ण सीरिजमध्ये उत्तम कामगिरी करणारा टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराचा मानकरी झाला.

कोलकातामध्ये झालेल्या तिसऱ्या मॅचमध्ये टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने २० ओव्हरमध्ये ७ बाद १८४ धावा केल्या. न्यूझीलंडला १७.२ ओव्हरमध्ये सर्वबाद १११ धावा करणे जमले. भारताने मॅच मोठ्या फरकाने जिंकली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून कॅप्टन असलेल्या रोहित शर्माने ५६, इशान किशनने २९, सुर्यकुमार यादवने शून्य, रिषभ पंतने ४, श्रेयस अय्यरने २५, वेंकटेश अय्यरने २०, अक्षर पटेलने नाबाद २, हर्षल पटेलने १८, दीपक चहरने नाबाद २१ धावा केल्या.  न्यूझीलंडकडून कॅप्टन असलेल्या मिचेल सँटनेरने तीन तर इश सोधी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिलने, लॉकी फर्ग्युसन या चौघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. फर्ग्युसनच्या चेंडूवर हर्षल पटेल स्वयंचित झाला.

धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडकडून मार्टिन गुप्टिलने ५१, डेरिल मिचेलने ५, मार्क चॅम्पमनने शून्य, ग्लेन फिलिप्सने शून्य, टिम सीफर्टने १७ (धावचीत), जेम्स नीशामने ३, मिचेल सँटनेरने २, अॅडम मिलनेने ७, इश सोधीने ९, लॉकी फर्ग्युसनने १४, ट्रेंट बोल्टने नाबाद २ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने तीन तर हर्षल पटेलने दोन विकेट घेतल्या. वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, दीपक चहर या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक

  1. बुधवार १७ नोव्हेंबर २०२१ - पहिली टी २०, जयपूर - संध्याकाळी ७ वा. - भारत ५ विकेट राखून विजयी
  2. शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१ - दुसरी टी २०, रांची - संध्याकाळी ७ वा. - भारत ७ विकेट राखून विजयी
  3. रविवार २१ नोव्हेंबर २०२१ - तिसरी टी २०, कोलकाता - संध्याकाळी ७ वा. - भारत ७३ धावांनी विजयी
  4. गुरुवार २५ नोव्हेंबर ते सोमवार २९ नोव्हेंबर २०२१ - पहिली टेस्ट, कानपूर - सकाळी ९.३० वा.
  5. शुक्रवार ३ डिसेंबर ते मंगळवार ७ डिसेंबर २०२१ - दुसरी टेस्ट, मुंबई - सकाळी ९.३० वा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी