IND vs WI T20 : भारताने विंडीजविरुद्धची टी २० सीरिज ४-१ अशी जिंकली, अखेरची मॅच ८८ धावांनी जिंकली

India won by 88 runs against West Indies : भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची पाच टी २० मॅचची सीरिज ४-१ अशी जिंकली. अखेरची मॅच भारताने ८८ धावांनी जिंकली.

India won by 88 runs against West Indies
भारताने विंडीजविरुद्धची टी २० सीरिज ४-१ अशी जिंकली, अखेरची मॅच ८८ धावांनी जिंकली  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • भारताने विंडीजविरुद्धची टी २० सीरिज ४-१ अशी जिंकली
 • अखेरची मॅच ८८ धावांनी जिंकली
 • अक्षर पटेल मॅन ऑफ द मॅच आणि अर्शदीप सिंह मॅन ऑफ द सीरिज

फ्लोरिडा : भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची पाच टी २० मॅचची सीरिज ४-१ अशी जिंकली. अखेरची मॅच भारताने ८८ धावांनी जिंकली. अमेरिकेतील फ्लोरिडातल्या सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड येथे पाचवी टी २० मॅच झाली. या मॅचमध्ये टॉस जिंकून बॅटिंग करणाऱ्या भारताने २० ओव्हरमध्ये ७ बाद १८८ धावा केल्या. वेस्ट इंडिजची टीम १५.४ ओव्हरमध्येच १०० धावांत ऑलआऊट झाली. अक्षर पटेल मॅन ऑफ द मॅच आणि अर्शदीप सिंह मॅन ऑफ द सीरिज झाला.

भारताकडून ईशान किशनने ११, श्रेयस अय्यरने ६४, दीपक हुडाने ३८, संजू सॅमसनने १५, कॅप्टन असलेल्या हार्दिक पांड्याने (धावचीत) २८, विकेटकीपर असलेल्या दिनेश कार्तिकने १२, अक्षर पटेलने ९, कुलदीप यादवने नाबाद शून्य आणि आवेश खानने नाबाद एक धाव एवढे योगदान दिले. भारताला १० एक्स्ट्रॉ (अवांतर) मिळाल्या. विंडीजकडून ओडीयन स्मिथने ३ तर हेडेन वॉल्श, जेसन होल्डर आणि डॉमिनिक ड्रेक्स या तिघांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने शून्य, शमराह ब्रूक्सने १३, विकेटकीपर असलेल्या डेवोन थॉमसने १०, शिमरॉन हेटमायरने ५६, कॅप्टन असलेल्या निकोलस पूरनने ३, रोव्हमन पॉवेलने ९, कीमो पॉलने शून्य, डॉमिनिक ड्रेक्सने १, ओडीयन स्मिथने शून्य, हेडेन वॉल्शने नाबाद शून्य, ओबेड मॅकॉयने शून्य धावा एवढे योगदान दिले. वेस्ट इंडिजला ८ एक्स्ट्रॉ (अवांतर) मिळाल्या. भारताकडून रवी बिश्नोईने ४ तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. 

भारताच्या विंडीज दौऱ्याचा निकाल

 1. भारत वि. वेस्ट इंडिज पहिली वन डे - भारताचा ३ धावांनी विजय
 2. भारत वि. वेस्ट इंडिज दुसरी वन डे - भारताचा २ विकेट राखून विजय
 3. भारत वि. वेस्ट इंडिज तिसरी वन डे - डकवर्थ लुईसनुसार भारताचा ११९ धावांनी विजय
 4. भारत वि. वेस्ट इंडिज पहिली टी २० - भारताचा ६८ धावांनी विजय
 5. भारत वि. वेस्ट इंडिज दुसरी टी २० - विंडीजचा ५ विकेट राखून विजय
 6. भारत वि. वेस्ट इंडिज तिसरी टी २० - भारताचा ७ विकेट राखून विजय
 7. भारत वि. वेस्ट इंडिज चौथी टी २० - भारताचा ५९ धावांनी विजय
 8. भारत वि. वेस्ट इंडिज पाचवी टी २० - भारताचा ८८ धावांनी विजय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी