T20 World Cup नामिबिया विरुद्ध विजय, 'कॅप्टन' कोहली निवृत्त

India won by 9 wkts against Namibia टीम इंडियाने नामिबिया विरुद्धची मॅच नऊ विकेट राखून जिंकली. नामिबिया विरुद्ध विजय मिळवला तरी टीम इंडियाचे आव्हान टी २० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर बारा फेरीतच संपले. विराट कोहलीने भारताच्या टी २० टीमच्या कॅप्टन पदावरुन निवृत्ती स्वीकारली.

India won by 9 wkts against Namibia
नामिबिया विरुद्ध विजय, 'कॅप्टन' कोहली निवृत्त 
थोडं पण कामाचं
  • नामिबिया विरुद्ध विजय, 'कॅप्टन' कोहली निवृत्त
  • टीम इंडियाने नामिबिया विरुद्धची मॅच नऊ विकेट राखून जिंकली
  • चार ओव्हरमध्ये १६ धावा देत तीन विकेट घेणारा रवींद्र जडेजा मॅन ऑफ द मॅच

India won by 9 wkts against Namibia । दुबईः टी २० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर बारा फेरीतल्या आजच्या (सोमवार ८ नोव्हेंबर २०२१) मॅचमध्ये भारताने नामिबियाचा पराभव केला. टीम इंडियाने नामिबिया विरुद्धची मॅच नऊ विकेट राखून जिंकली. नामिबिया विरुद्ध विजय मिळवला तरी पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये हरल्यामुळे ग्रुप २ मध्ये भारताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यामुळे टीम इंडियाचे आव्हान सुपर बारा फेरीतच संपले.

भारताच्या टी २० टीमचे कॅप्टनपद वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच सांभाळणार असल्याचे विराट कोहलीने जाहीर केले होते. या घोषणेनुसार नामिबिया विरुद्धची मॅच जिंकत कोहलीने कॅप्टन पदावरुन निवृत्ती स्वीकारली. आता तो भारताच्या टी २० टीमचा खेळाडू म्हणून पुढे कारकिर्द सुरू ठेवेल.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताच्या टी २० टीमने ५० पैकी ३२ मॅचमध्ये विजय मिळवला. कोहलीच्या नेतृत्वात भारताला १६ टी २० मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला तर दोन टी २० मॅचचा निकाल लागला नाही. 

दुबईत नामिबिया विरुद्धच्या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या नामिबियाने वीस ओव्हरमध्ये ८ बाद १३२ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने १५.२ ओव्हरमध्ये १ बाद १३६ धावा करुन मॅच जिंकली. या मॅचमध्ये रोहित शर्माने ३७ बॉल खेळून ५६ धावा केल्या. केएल राहुलने ३६ बॉल खेळून नाबाद ५४ धावा केल्या. सुर्यकुमार यादवने १९ बॉल खेळून नाबाद २५ धावा केल्या. याआधी भारताच्या रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन या दोघांनी प्रत्येकी तीन तर जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या. चार ओव्हरमध्ये १६ धावा देत तीन विकेट घेणारा रवींद्र जडेजा मॅन ऑफ द मॅच झाला. 

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर न्यूझीलंडचा भारत दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड आणि भारत यांच्यात तीन टी २० आणि दोन टेस्ट मॅच होणार आहेत.

  1. बुधवार १७ नोव्हेंबर २०२१ - पहिली टी २०, जयपूर - संध्याकाळी ७ वा.
  2. शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१ - दुसरी टी २०, रांची - संध्याकाळी ७ वा.
  3. रविवार २१ नोव्हेंबर २०२१ - तिसरी टी २०, कोलकाता - संध्याकाळी ७ वा.
  4. गुरुवार २५ नोव्हेंबर ते सोमवार २९ नोव्हेंबर २०२१ - पहिली टेस्ट, कानपूर - सकाळी ९.३० वा.
  5. शुक्रवार ३ डिसेंबर ते मंगळवार ७ डिसेंबर २०२१ - दुसरी टेस्ट, मुंबई - सकाळी ९.३० वा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी