India won first test against Bangladesh, Dominant India clinch 188-run win to go 1-0 up : बांगलादेशला हरवत भारताने पहिली टेस्ट मॅच जिंकली आणि दोन टेस्टच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. चट्टोग्राम येथे झालेल्या मॅचमध्ये भारताने 188 धावांनी विजय मिळवला. भारताचा कुलदीप यादव पहिल्या टेस्टचा मॅन ऑफ द मॅच झाला.
पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या भारताने पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा आणि दुसऱ्या डावात 2 बाद 258 धावा (डाव घोषीत) केल्या. बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद 150 धावा आणि दुसऱ्या डावात सर्वबाद 324 धावा केल्या.
भारताकडून पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने 90, श्रेयस अय्यरने 86, आर. अश्विनने 58, रिषभ पंतने 46, कुलदीप यादवने 40 धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतकडून शुभमन गिलने 110 आणि चेतेश्वर पुजाराने 102 धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात गिल आणि पुजाराच्या शतकांच्या जोरावर 2 बाद 258 या धावसंख्येवर डाव घोषीत केला. बांगलादेशला अखेरच्या डावात 513 धावा करण्याचे आव्हान दिले. यजमान बांगलादेशने चौथ्या दिवशी पराभव टाळला पण पाचव्या दिवशी जास्त वेळ तग धरणे त्यांना जमले नाही. अखेर भारताचा 188 धावांनी विजय झाला.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच गुरुवार 22 डिसेंबर 2022 ते सोमवार 26 डिसेंबर 2022 या कालावधीत ढाका येथील शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. मॅचचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होईल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अर्थात WTCच्या फायनलमध्ये दाखल होण्यासाठी भारताला सहा पैकी पाच टेस्ट मॅच जिंकणे आवश्यक आहे. भारत आता बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे. या सीरिजची पहिली मॅच जिंकून भारताने चांगली सुरुवात केली आहे. भारताला बांगलादेश विरुद्ध ढाक्यात दुसरी टेस्ट खेळायची आहे. यानंतर भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार टेस्ट मॅचची सीरिज खेळायची आहे. बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमधील कामगिरीच्या जोरावर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील स्वतःची कामगिरी सुधारू शकणार आहे. यामुळेच भारतासाठी बांगलादेश विरुद्धची टेस्ट सीरिज महत्त्वाची आहे. या सीरिजमध्ये विजयाने सुरुवात करून टीम इंडियाने भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आशा उंचावल्या आहेत.
बांगलादेशने रविवारी पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात आणि मॅचच्या अखेरच्या डावात 6 बाद 272 धावा केल्या होत्या. यामुळे शेवटच्या दिवशी बांगलादेश किती तग धरणार यावर मॅचचा निकाल अवलंबून होता.
पाचव्या दिवशी मोहम्मद सिराजने मेहदी हसनला (13) उमेश यादवकरवी झेलबाद केले. शाकिब अल हसन (84) आणि ताईजुल इस्लाम (4) यांनी आठव्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. बांगलादेशने या भागीदारीच्या जोरावर 300 धावांचा टप्पा ओलांडला. कुलदीप यादवने शाकिबला क्लीनबोल्ड केले. नंतर कुलदीपने इबादत हुसेनला शून्य धावांवर बाद केले. हुसेन श्रेयस अय्यरकडे झेल देऊन परतला. हा बांगलादेशला बसलेला नववा धक्का होता. अक्षर पटेलने इस्लामला क्लीनबोल्ड केले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
कुलदीप यादवने बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये बॅटिंग करताना पहिल्या डावात 40 धावा केल्या. नंतर बांगलादेशचा पहिला डाव सुरू असताना कुलदीपने 5 विकेट घेतल्या. त्याने दुसऱ्या डावात बांगलादेशच्या 3 विकेट घेतल्या दोन्ही डावात मिळून कुलदीपने 40 धावा केल्या आणि 8 विकेट घेतल्या. या कामगिरीसाठीच त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
Sanju Samson Offer:निवड समितीकडून वारंवार डावलल्या जाणाऱ्या संजूला आयर्लंडकडून ऑफर; पण..