IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध भारताचा मालिका विजय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 22, 2022 | 16:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 1-0 असा विजय मिळवला आहे.

india vs new zealand
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध भारताचा मालिका विजय 
थोडं पण कामाचं
  • भारत वि न्यूझीलंड तिसरी टी20
  • न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये केल्या 160 धावा
  • टीम इंडियाने मालिका 1-0 अशी जिंकली.

मुंबई: नेपियरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या भारत वि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामना बरोबरीत सुटला आहे. यासोबतच भारताने ही मालिका 1-0 अशी जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यत आल्याने सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे भारताने ही मालिका जिंकली आहे. 

अधिक वाचा - थंडीत हात फुटायला लागले की करा हे घरगुती उपाय

न्यूझीलंडने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 160 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताची फलंदाजी सुरू झाली. मात्र भारताच्या 4 बाद 75 धावा झालेल्या असताना पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे खेळ मध्येच थांबवावा लागला. शेवटचा सामना बरोबरीत सुटला. भारताने या मालिकेत आधीच 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे तिसरा आणि शेवटचा सामना बरोबरीत सुटल्याने भारताने ही मालिका 1-0 अशी जिंकली. 

तिसऱ्या सामन्यात भारताचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले होते. तर न्यूझीलंडचे कर्णधारपद टीम साऊदीकडे देण्यात आले आहे. कर्णधार केन विल्यमसन्स मेडिकल अपॉईंटमेंटमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. 

भारताच्या गोलंदाजांनी सुरूवातीला या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांना कंजूसपणे धावा दिल्या. मात्र नंतरच्या षटकात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जोरदार धावा चोपल्या, यामुळे न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये 160 धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून सलामीवीर फिन अॅलेन अपयशी ठरला. तो केवळ 3 धावा करून बाद झाला. तर दुसरा सलामीवीर डेवॉन कॉनवेने धमाकेदार अर्धशतक ठोकले. डेवॉन कॉनवेने 59 धावा केल्या. तर ग्लेन फिलिप्सने त्याला चांगली साथ देत 54 धावांची खेळी केली. 

भारताकडून खेळताना सलामीवीर साफ अपयशी ठरले. इशान किशन 10 धावा करून परतला तर ऋषभ पंतला केवळ 11 धावा करता आल्या. सूर्यकुमार यादवलाही या सामन्यात केवळ 13 धावा करण्यात यश मिळाले. क्रीझवर हार्दिक पांड्या 30 धावांवर नाबाद होता. श्रेयस अय्यरला तर भोपळाही फोडता आला नाही. 

दुसऱ्या सामन्यात सूर्याची झुंजार खेळी

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात जबरदस्त खेळी केली. त्याने या सामन्यात तडाखेबंद शतक ठोकले. त्याने नाबाद 111 धावा ठोकल्या. इशान किशनने 31 बॉल्समध्ये 36 धावा केल्या. श्रेयस अय्यतरने 13 धावा आणि हार्दिक पांड्यानेही 13 धावा केल्या. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या खेळीच्या जोरावर 191 धावा केल्या. मात्र न्यूझीलंडच्या संघाला केवळ 126 धावा करता आल्या. 

अधिक वाचा - कधी आहे आहे दर्श अमावस्या 'या' दिवशी काय केल्याने होईल फायदा

पहिला सामना पावसामुळे रद्द

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यात एकही बॉल खेळवला गेला नाही. सतत पाऊस कोसळत असल्याने हा सामना पूर्णपणे रद्द करण्यात आला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी