INDvsBAN: पाऊस आला धावून, भारताचा बांगलादेशवर विजय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 02, 2022 | 17:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 WC 2022: शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशवर डकवर्थ लुईस नियमानुसार पाच धावांनी विजय मिळवला.

lokesh rahul
भारताचा धावांचा डोंगर, बांगलादेशसमोर 185 धावांचे आव्हान 
थोडं पण कामाचं
  • गेल्या तीन सामन्यात सातत्याने अपयशी ठरत असलेला भारताचा सलामीवीर केएल राहुलला या सामन्यात आपला सूर गवसला.
  • बांगलादेशने सामन्यात टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना   धावा केल्या आहेत.

मुंबई: भारत(india) आणि बांगलादेश(bangladesh) यांच्यातील सामन्यात भारताने बांगलादेशवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस(D/l) नियमानुसार पाच धावांनी विजय मिळवला. यासोबतच भारत ग्रुप 2मध्ये 6 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगला होता. अखेरची ओव्हर निर्णायक राहिली. India won the match against bangladesh by 5 runs of D/L 

अधिक वाचा - Pathaan Teaser : Shah Rukh Khanने चाहत्यांसाठी बर्थडे गिफ्ट

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात पावसाने मदतीला धावून येत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मदत केली. सुरूवातीला 185 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशची सुरूवात दमदार झाली. त्यांची सुरूवातीची फलंदाजी पाहून असेच वाटत होते की बांगलादेश हा सामना जिंकणार की काय. सात ओव्हर झाल्या तरीही बांगलादेशची एकही विकेट पडली नव्हती. मात्र त्याचवेळेला पाऊस धावून आला.

पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ काही वेळ थांबवण्यात आला.त्यानंतर बांगलादेशला विजयासाठी 54 बॉलमध्ये 85 धावांचे आव्हान देण्यात आले. मात्र मैदानावर येताच भारतीय गोलंदाजांनी पहिली सलामीची जोडी फोडली. लिटन दास जबरदस्त फॉर्मात होता. मात्र त्याला बाद करत भारताला पहिले यश मिळाले. पावसानंतर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताचे वर्चस्व जास्त पाहायला मिळाले. 

तत्पूर्वी, सलामीवीर लोकेश राहुल(KL rahul)  आणि किंग कोहलीच्या(virat kohli)  जबरदस्त खेळीच्या जोरावर भारतीय संघाने(indian team) बांगलादेशविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना 184  धावा केल्या आहेत. बांगलादेशने सामन्यात टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांना हा निर्णय चांगलाच महागात पडला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) या सामन्यात अपयशी ठरला. 

कोहलीचा मंत्र यशस्वी, राहुलचे अर्धशतक

गेल्या तीन सामन्यात सातत्याने अपयशी ठरत असलेला भारताचा सलामीवीर केएल राहुलला या सामन्यात आपला सूर गवसला. लोकेश राहुलने या सामन्यात शानदार अर्धशतक ठोकले. त्याने 32 बॉलमध्ये अर्धशतकी खेळी केली. अर्धशतक ठोकल्यानंतर पुढच्याच बॉलवर तो कॅच देत बाद झाला. या सामन्याआधी विराट कोहलीने लोकेश राहुलला काही मार्गदर्शन केले होते. तेच कदाचित या सामन्यात कामी आले. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

सूर्याच्या 30 धावा

सूर्यकुमार यादवने या सामन्यात 30 धावांची खेळी केली. त्याने 16 बॉलचा सामना केला. 

किंग कोहलीचा मोठा रेकॉर्ड, ठोकले अर्धशतक

कोहलीने या सामन्यात कमालीचा खेळ करताना मोठा रेकॉर्ड बनवला आहे. कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नाबाद 64 धावा ठोकल्या. विराट कोहली टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धााव करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने महेला जयवर्धनेला मागे टाकले. महेला जयवर्धनेने टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक 1016 धावा केल्या आहेत. 

अधिक वाचा - चंद्रग्रहणाच्या वेळी चुकूनही 'हे' काम केलात तर होईल नुकसान

बांगलादेशला जिंकण्यासाठी हव्यात इतक्या धावा

भारताविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 185 धावांची गरज आहे. बांगलादेशने टॉस जिंकताना पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र लोकेश राहुल आणि कोहलीने जबरदस्त फटकेबाजी करताना संघाला दीडशेपार नेले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी