India won third T20 and swallow T20 series against Sri Lanka, ODI series from 10th January 2023 : भारताने श्रीलंकेविरुद्धची तिसरी टी 20 मॅच 91 धावांनी जिंकली. या विजयासह भारताने श्रीलंकेविरुद्धची 3 मॅचची टी 20 सीरिज 2-1 अशी जिंकली. या सीरिजमधील पहिली आणि तिसरी मॅच भारताने तर दुसरी मॅच श्रीलंकेने जिंकली. तिसऱ्या मॅचमध्ये 51 बॉल खेळून 9 सिक्स आणि 7 फोर मारत नाबाद 112 धावा करणारा सूर्यकुमार यादव प्लेअर ऑफ द मॅच (मॅन ऑफ द मॅच) झाला तर अक्षर पटेल प्लेअर ऑफ द सीरिज (मॅन ऑफ द सीरिज) झाला. आता भारत आणि श्रीलंका यांच्यात मंगळवार, 10 जानेवारी 2023 पासून 3 मॅचची वन डे सीरिज सुरू होत आहे. या सीरिजमधील मॅच अनुक्रमे गुवाहाटी, कोलकाता आणि तिरुवअनंतपुरम येथे होतील.
Sunday Mega Block | हुश्श…! या मार्गावरील मुंबईकरांना दिलासा, जाणून घ्या कुठे आहे मेगाब्लॉक
Accident : आमदार योगेश कदमांच्या कारला भीषण अपघात; घातपाताचा संशय, घटनेनंतर कदमांनी दिली प्रतिक्रिया
तिसऱ्या टी 20 मध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या भारताने 20 ओव्हरमध्ये 5 बाद 228 धावा केल्या. ईशान किशनने 1, शुभमन गिलने 46, राहुल त्रिपाठीने 35, सूर्यकुमार यादवने नाबाद 112, हार्दिक पांड्याने 4, दीपक हुडाने 4 आणि अक्षर पटेलने नाबाद 21 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने 2 तर राजिता, हसरंगा आणि करुणारत्ने यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेचा डाव लवकर आटोपला. भारताने लंकेला 16.4 ओव्हरमध्ये 137 धावांत गुंडाळले. भारताकडून अर्शदीप सिंहने 3 विकेट घेतल्या तर हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिक या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. अक्षर पटेलने 1 विकेट घेतली. श्रीलंकेकडून पथुम निसंकाने 15, कुसल मेंडिसने 23, अविष्का फर्नांडोने 1, धनंजय डी सिल्वाने 22, चरित असलंकाने 19, दासुन शनाकाने 23, वानिन्दु हसरंगाने 9, चामिका करुणारत्नेने शून्य, महेश ठीकशानाने 2, दिलशान मदुशंका 1 आणि कसुन राजिथाने नाबाद 9 धावांचे योगदान दिले.