U19 Asia Cup IND vs SL Final : भारताने श्रीलंकेविरुद्धची मॅच ९ विकेट राखून जिंकली, आठव्यांदा आशिया कप चॅम्पियन

India won U19 Asia Cup : भारताने १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेच्या फायनल मॅचमध्ये श्रीलंकेचा नऊ विकेट राखून पराभव केला. मॅच जिंकून भारत आठव्यांदा १९ वर्षांखालील आशिया कप चॅम्पियन झाला.

India won U19 Asia Cup
भारत आठव्यांदा आशिया कप चॅम्पियन 
थोडं पण कामाचं
  • भारताने श्रीलंकेविरुद्धची मॅच ९ विकेट राखून जिंकली
  • भारत आठव्यांदा १९ वर्षांखालील आशिया कप चॅम्पियन
  • भारत एकदाही आशिया कप स्पर्धा हरलेला नाही

India won U19 Asia Cup : भारताने १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेच्या फायनल मॅचमध्ये श्रीलंकेचा नऊ विकेट राखून पराभव केला. मॅच जिंकून भारत आठव्यांदा १९ वर्षांखालील आशिया कप चॅम्पियन झाला. हा १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील विक्रम आहे. भारत वगळता कोणत्याही टीमला आठ वेळा १९ वर्षांखालील आशिया कप जिंकणे जमलेले नाही.

टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या श्रीलंकेने ३८ ओव्हरमध्ये ९ बाद १०६ धावा केल्या. भारताला डकवर्थ लुइस नियमानुसार मॅच जिंकण्यासाठी १०२ धावा करायच्या होत्या. भारताने हे आव्हान २१.३ ओव्हरमध्ये एक विकेट गमावून पूर्ण केले. रघुवंशीने ६७ चेंडूत सात चौकारांसह नाबाद ५६ धावा केल्या. शेख रशीदने ४९ चेंडूत दोन चौकारांसह नाबाद ३१ धावा केल्या. याआधी पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही टीमना प्रत्येकी ३८ ओव्हर खेळण्यासाठी देण्याचा निर्णय झाला होता. 

आतापर्यंत नऊ वेळा १९ वर्षांखालील आशिया कप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन झाले आहे. यापैकी आठ वेळा भारताने ही स्पर्धा जिंकली. फक्त २०१२ मध्ये भारताला संयुक्त विजेता जाहीर करण्यात आले. भारत एकदाही आशिया कप स्पर्धा हरलेला नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी