Krunal Pandya Twitter: भारताच्या या ऑलराऊंडर क्रिकेटरचे ट्विटर अकाऊंट हॅक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 27, 2022 | 17:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Krunal Pandya's Twitter account got hacked: भारतीय संघाचा ऑलराऊंडर कृणाल पांड्याचे ट्विटर अकाऊंट गुरूवारी हॅक झाले. हॅकरने लिहिले की तो बिटकॉईनसाठी अकाऊंट विकत आहे. या शिवाय सोशल मीडियावर काहीतरी खराब ट्वीटही केले.

krunal pandya
Twitter: भारताच्या या ऑलराऊंडर क्रिकेटरचे ट्विटर अकाऊंट हॅक 
थोडं पण कामाचं
  • कृणाल पांड्याचे ट्विटर अकाऊंट गुरूवारी झाले हॅक
  • हॅकरने लिहिले की तो बिटकॉईनसाठी आपले अकाऊंट विकत आहे. 
  • कृणाल पांड्या आयपीएल १५मध्ये क्रिकेट खेळताना दिसणार आहे. 

मुंबई: टीम इंडियाचा ऑलराऊंडर कृणाल पांड्या(team india allrounder krunal pandya गुरूवारी सकाळी सायबर हॅकिंगचा शिकारी ठरला. डाव्या हाताचा स्पिन ऑलराऊंडरचे ट्विटर अकाऊंट हॅक(twitter account hack) झाले. कृणाल पांड्याचे ट्विटर अकाऊंट हॅक करणाऱ्या हॅकरने लिहिले की तो बिटकॉईनसाठी ट्विटर अकाऊंट विकत आहे. सोबतच त्याने ट्विटर युजर्सकडून क्रिप्टोकरन्सीही पाठवण्यास सांगितली. इतकंच नव्हे तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही युजर्ससाठी घाणेरडी ट्वीटही केली. indian allrounder cricketer krunal pandya twitter account hack

हॅकरने गुरूवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास क्रिकेटरच्या अकाऊंटवरून एक ट्वीट रिट्वीट केले. दोन मिनिटांनंतर त्याने एका युझरला थँक्यूही म्हटले. हॅकरने आतापर्यंत कृणालच्या ट्विटर अकाऊंटवरून तब्बल १० ट्वीट केले आहे. तसे गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक क्रिकेटर्सचे अकाऊंट हॅक झाले आहेत. 

अधिक वाचा - अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर सोने घसरले

२०१९मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर शेन वॉटसनचे ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंट्स हॅक झाले होते. ऑक्टोबर २०१४मध्ये भारताचा माजी विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेलने आपल्या फॉलोअर्सना येणाऱ्या अपडेटकडे दुर्लक्ष करण्याची विनंती केली होती. कारण त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. 

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कृणाल पांड्या आयपीएल २०२२मध्ये क्रिकेट खेळताना दिसणार आहे. ३० वर्षीय ऑलराऊंडरने दीर्घकाळ मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यानस गेल्या वर्षी फ्रेंचायझीने त्याला रिटेन केले नाही आणि तो रिलीज झाला. कृणाल पाड्या २०१६पासून तो मुंबई इंडियन्ससाठी खेळत आहे. २०१८मध्ये ८.८ कोटींना त्याला रिटेन केले होते. आयपीएल २०२१मध्ये कृणाल पांड्याची कामगिरी खूपच निराशाजनक ठरली होी. त्यानंतर फ्रेंचायझीने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. 

अधिक वाचा - ब्राच्या साईजवरुन श्वेता तिवारीची गंदीबात

दरम्यान, कृणालचा भाऊ हार्दिकला अहमदाबाद फ्रेंचायझीने १५ कोटींना घेतले. हार्दिक पांड्या अहमदाबादचा कर्णधार बनला आहे. कृणाल पांड्या तिसऱ्यांदा लिलावात येणार. तीन वेळा आयपीएल विजेता खेळाडूने टी-२० लीगमध्ये आतापर्यंत ८४ सामने खेळलेत. यात त्याने ११४३ धावा केल्यात तर ५१ विकेट मिळवल्यात. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी