भारताला पाच गोलंदाज विजय मिळवून देतील

Indian bowlers can beat australia पाच प्रमुख गोलंदाजांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची कोंडी करुन भारत विजयश्री खेचून आणेल, असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.

Indian bowlers can beat australia
भारताला पाच गोलंदाज विजय मिळवून देतील 

थोडं पण कामाचं

 • भारताला पाच गोलंदाज विजय मिळवून देतील
 • टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी व्यक्त केला विश्वास
 • ऑस्ट्रेलियाची कोंडी करुन भारत विजयश्री खेचून आणेल - रवी शास्त्री

सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीत २७ नोव्हेंबर रोजी पहिली वन डे मॅच होत आहे. या मॅचपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन वन डे, तीन टी ट्वेंटी आणि चार टेस्ट मॅच खेळणार आहे. सर्व मॅच ऑस्ट्रेलियात होणार आहेत. या दौऱ्यात भारताला पाच गोलंदाज विजय मिळवून देतील, असा विश्वास टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. (Indian bowlers can beat australia)

विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया पहिल्या वन डे पासून पहिल्या टेस्ट पर्यंत खेळणार आहे. शेवटच्या तीन टेस्टमध्ये विराट कोहली खेळणार नाही. होणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी विराट मायदेशी परतणार आहे. पण गोलंदाजांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची कोंडी करुन भारत विजयश्री खेचून आणेल, असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.

भारताकडे जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि नवदीप सैनी हे प्रभावी गोलंदाज आहेत. ईशांत शर्मा खेळणार की नाही हे स्पष्ट नसले तरी बाकीचे पाच गोलंदाज ऑस्ट्रेलियाची कोंडी करण्यासाठी सक्षम आहेत, असे रवी शास्त्री म्हणाले. निवड समितीने रोहित शर्माचा समावेश टेस्टसाठीच्या टीममध्ये केला आहे तर ईशांत विषयीचा निर्णय त्याचा फिटनेस तपासून घेतला जाणार आहे. रोहित आणि ईशांत लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची शक्यता आहे. 

भारतीय फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला असेल तर जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि नवदीप सैनी हे प्रभावी गोलंदाज ऑस्ट्रेलियाची कोंडी करण्यासाठी सक्षम आहे, असे रवी शास्त्री म्हणाले. फलंदाज ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०२०-२१)

वन डे

 1. पहिली वन डे - २७ नोव्हेंबर, सिडनी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१०
 2. दुसरी वन डे - २९ नोव्हेंबर, सिडनी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१०
 3. तिसरी वन डे - १ डिसेंबर, कॅनबेरा, मनुका ओव्हल ग्राउंड, भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१०

टी ट्वेंटी

 1. पहिली टी ट्वेंटी - ४ डिसेंबर, कॅनबेरा, मनुका ओव्हल ग्राउंड, भारतीय वेळेनुसार दुपारी १.४०
 2. दुसरी टी ट्वेंटी - ६ डिसेंबर, सिडनी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार दुपारी १.४०
 3. तिसरी टी ट्वेंटी - ८ डिसेंबर, सिडनी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार दुपारी १.४०

टेस्ट

 1. पहिली टेस्ट - १७ ते २१ डिसेंबर (डे नाईट, पिंक बॉल मॅच), अॅडलेड ओव्हल, भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३०
 2. दुसरी टेस्ट - २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार पहाटे ५
 3. तिसरी टेस्ट - ७ ते ११ जानेवारी, सिडनी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार पहाटे ५
 4. चौथी टेस्ट - १५ ते १९ जानेवारी, ब्रिस्बेन, द गाबा ब्रिस्बेन, भारतीय वेळेनुसार पहाटे ५.३०

प्रॅक्टिस मॅच

 1. पहिली प्रॅक्टिस मॅच - इंडिया ए वि. ऑस्ट्रेलिया ए, सिडनी, ड्रमॉएन ओव्हल ग्राउंड, भारतीय वेळेनुसार पहाटे ५
 2. दुसरी प्रॅक्टिस मॅच - इंडिया ए वि. ऑस्ट्रेलिया ए, सिडनी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी ट्वेंटी भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन डे भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, मयांक अगरवाल, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (विकेटकीपर)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टेस्ट भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमान विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी