दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, रोहित शर्मा सलामीला येणार! 

टीम इंडियाचा वनडे आणि टी-२० मधील धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आता कसोटी सलामीला येणार आहे. नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघ जाहीर करण्यात आला आहे. 

test_virat
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • बीसीसीआयने द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड
  • भारतीय संघातून केएल राहुलला डच्चू, रोहित शर्माने करणार डावाची सुरुवात 
  • द. आफ्रिकेविरुद्ध भारत तीन कसोटी सामने खेळणार

मुंबई: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने आज (गुरुवार) दक्षिण आफ्रिकेविरोधातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. आज हा संघ घोषित करण्यात आला. टीम इंडियाचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील सलामीवीर रोहित शर्मा आता कसोटीत देखील ओपनिंग करताना दिसू शकतो. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पहिला कसोटी सामना हा २ ऑक्टोबरला विशाखापट्टणमला खेळविण्यात येणार आहे. 

भारतीय संघाने केएल राहुलच्या जागी शुभमन गिलचा संघात समावेश केला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात हा एक बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाकडून मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा हे सलामीला फलंदाजी करताना दिसून येतील. 

 

केएल राहुलने मागील ३० कसोटी डावांमध्ये ६६४ धावाच केल्या आहेत. यामध्ये त्याची चांगली कामगिरी ही मागील वर्षी ओव्हलवर इंग्लंडविरोधात पाचव्या कसोटीमध्ये पाहायला मिळाली होती. भारतीय संघात आता कसोटीसाठी देखील बरेच बदल पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे कसोटी संघात उमेश यादव देखील स्थान मिळवू शकला नाही. त्यालाही सध्या संघाबाहेरच ठेवण्यात आलं आहे. 

टीम इंडियाच्या मधल्या फळीची जबाबदारी ही चेतेश्वर पुजारा कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांच्यावर असणार आहे. याशिवाय रिषभ पंत आणि रिद्धिमान साहा यांच्यावर विकेटकिपिंग आणि फलंदाजी अशी दुहेरी जबाबदारी असेल. पण यावेळी अंतिम ११ जणांच्या यादीत साहा जागा मिळवणार की, रिषभ पंत हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडे फिरकी गोलंदाजीची जबाबदारी ही रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे. 

कसोटी सामन्यांचं वेळापत्रक:

भारत-दक्षिण आफ्रिका, पहिली कसोटी २-६ ऑक्टोबर, विशाखापट्टणम

भारत-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी १०-१४ ऑक्टोबर, पुणे 

भारत-दक्षिण आफ्रिका तिसरी कसोटी १९-२३ ऑक्टोबर रांची 

असा असेल कसोटीसाठी भारतीय संघ:  

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्‍मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि शुभमन गिल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...