World Cup 2019: वर्ल्ड कपसाठी या दिवशी रवाना होईल टीम इंडिया

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 16, 2019 | 12:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Cup 2019 team India: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ साठी टीम इंडिया २२ मे रोजी इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. दरम्यान यावेळी केदार जाधव टीम इंडियासोबत जाणार की नाही याबाबत अद्याप शंका निर्माण केली जात आहे.

Team India (File Photo)
टीम इंडिया (फाइल फोटो)   |  फोटो सौजन्य: PTI

ICC World Cup 2019 team India: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ इंग्लंडमध्ये ३० मे रोजीपासून सुरू होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण १० टीम सहभाग घेणार आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणारी भारतीय क्रिकेट टीमला या वर्ल्ड कपचं मजबूत दावेदार मानलं जातं आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०१९ मध्ये जवळपास दोन महिने सतत सामने खेळल्यानंतर आता टीम इंडियाचे खेळाडू वर्ल्ड कपच्या मिशनवर जात आहेत. 

टीम इंडिया २२ मे रोजी सकाळी मुंबईहून इंग्लंडसाठी रवाना होतील. यावेळी वर्ल्ड कपसाठी निवडलेली १५ जणांची टीम रवाना होईल. मात्र या १५ जणांपैकी टीममधला १ खेळाडू टीमसोबत रवाना होईल की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. केदार जाधव सध्या जखमी झाला आहे. त्यामुळे २२ मे रोजी केदार इंग्लंडसाठी रवाना होईल का असाच प्रश्न समोर उभा राहिला आहे.अशीच अपेक्षा केली जात आहे की,  जाधव लवकरच फिट होईल. तर केदारच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं ही दिसतं आहे. टीम इंडिया भारतातून रवाना होईपर्यंत केदार जाधव फिट होईल, अशी अपेक्षा टीम व्यवस्थापनेला आहे. 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १२ व्या सिझनमध्ये केदार जाधवचा चेन्नई सुपर किंग्सच्या टीममध्ये समावेश होता. यावेळी किंग्स इलेव्हन पंजाबविरूद्धच्या सामन्यात केदार जाधवच्या खांद्याला दुखापत झाली. जाधवला दुखापत सामन्यात पंजाबच्या खेळीत १४ व्या ओव्हरमध्ये झाली. जेव्हा जाधवनं रविंद्र जडेजाची ओव्हर थ्रो थांबवण्यासाठी डाव्या बाजूस डाईव्ह मारली होती. त्यानंतर केदार जाधवनं तात्काळ मैदान सोडून दिलं. 

टीम इंडिया ५ जूनपासून Southampton च्या मैदानावर दक्षिण आफ्रिकाविरूद्ध आपल्या मिशनची सुरूवात करेल. मात्र त्यांच्याआधी विराट सेना २५ आणि २८ मे रोजी दोन प्रॅक्टिस मॅच खेळेल. 

दुसरीकडे वर्ल्डकपमध्ये एका खेळाडूचं प्रदर्शन टीम व्यवस्थापनेसाठी डोकेदुखी ठरू शकतं. हा खेळाडू बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही बाबतीत पूर्ण सीझनमध्ये अयशस्वी ठरला आहे. टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतोय ऑलराऊंडर क्रिकेटपटू विजय शंकर. विजय शंकरला वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये तो थ्री डायमेंशनल पर्याय असेल, हा विचार करून घेतलं गेलं आहे. १५ एप्रिलला जेव्हा टीमची घोषणा झाली तेव्हा टीम निवडकर्ते एम एस के प्रसाद यांनी विजय शंकरला नंबर ४ वर बॅटिंग करणारा मुख्य बॅट्समन म्हटलं होतं. मात्र १५ दिवसांमध्येच विजयनं आपल्या प्रदर्शनानं सर्वांना निराश केलं आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय टीम पुढील प्रमाणे आहे:

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, एमएस धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि मोहम्‍मद शमी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup 2019: वर्ल्ड कपसाठी या दिवशी रवाना होईल टीम इंडिया Description: World Cup 2019 team India: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ साठी टीम इंडिया २२ मे रोजी इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. दरम्यान यावेळी केदार जाधव टीम इंडियासोबत जाणार की नाही याबाबत अद्याप शंका निर्माण केली जात आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola