Shikhar Dhawan: पराभवानंतर भडकला शिखर धवन, यांना ठरवले जबाबदार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 25, 2022 | 20:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

INDvsNZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाला 7 विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यातील पराभवानंतर कर्णधार शिखर धवनने मोठे विधान केले आहे. 

shikhar dhawan
पराभवानंतर भडकला शिखर धवन, यांना ठरवले जबाबदार 
थोडं पण कामाचं
  • भारत वि न्यूझीलंड पहिला वनडे सामना
  • न्यूझीलंडचा 7 विकेटनी पराभव
  • पराभवानंतर खेळाडूंवर भडकला शिखर धवन

मुंबई: न्यूझीलंडने(new zealand) पहिल्या वनडे सामन्यात(one day match) टीम इंडियाला(team india) धमाकेदार पद्धतीने 7 विकेटनी हरवले. भारतीय संघाकडून अनेक स्टार प्लेयर्सनी खूप खराब खेळ दाखवला. तर भारतीय संघाची फिल्डिंगही खराब झाली. सामन्यातील पराभवानंतर कर्णधार शिखर धवनने(captain shikhar dhawan) पराभवाचे कारण सांगितले. तसेच अनेक खेळाडूंवर टीकाही केली. जाणून घेऊया(Indian cricketer shikhar dhawan blame for lost match against new zealand)

अधिक वाचा - Viral Video : मगर आणि कासवाची Viral झालेली गोष्ट

शिखर धवन म्हणाला असं काही...

भारताचा कर्णधार शिखर धवन सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात म्हणाला, आम्ही चांगला स्कोर केला होता. सुरूवातीच्या 15 ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाजांचा बॉल स्विंग होत होता. हे मैदान दुसऱ्या मैदानांपेक्षा वेगळे आहे. आम्ही आज शॉर्ट ऑफ लेंथ बॉल अधिक केले ज्या कारणामुळे लॅथमला मोठे शॉट खेळण्यास सोपे झाले. आम्ही फिल्डिंग खराब केली. 

टॉमने खेचून घेतली मॅच

शिखर धवन पुढे बोलताना म्हणाला, टॉम लॅथमने आमच्या शॉट गोलंदाजीचा फायदा उचलला आणि सामना आमच्या हातातून निसटला. त्याने 40व्या ओव्हरमध्ये अनेक बाऊंड्री लगावत सामन्याचे चित्रच बदलले. या ओव्हरआधी सामना आमच्या बाजूने थोड्याफार प्रमाणात होता. न्यूझीलंडच्या डावातील 40वी ओव्हर शार्दूल ठाकूरने केली होती.

रणनीतीवर करावे लागेल काम

भारताचा कर्णधार शिखर धवन म्हणाला, आम्हाला आपल्या रणनीतीवर काम करावे लागेल आणि सुनिश्चित करावे लागेल की आम्ही फलंदाजांना त्यांच्या स्ट्रेंथवर खेळू न देणे. हा एक युवा संघ आहे आणि मला माझ्या संघावर गर्व आहे. 

अधिक वाचा - राष्ट्रवादीचा खासदार भाजपच्या वाटेवर

न्यूझीलंडने जिंकला सामना

टॉम लॅथमने 104 बॉलमध्ये नाबाद 145 धावा केल्या आणि कर्णधार केन विल्यमसन्सने 98 बॉलमध्ये नाबाद 94 धावांसह चौथ्या विकेटसाठी 221 धावांची नाबाद भागीदारी केली. त्यांच्या या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने भारताने दिलेले आव्हान सोपे परतून लावले. न्यूझीलंडने 17 बॉल राखून सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना रविवारी हॅमिल्टनमध्ये खेळवला जाणार आहे.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी