Shreyas Iyer Mercedes | टीम इंडियाचा विकेट कीपर (Wicket Keeper) आणि बॅट्समन (Batsman) श्रेयस अय्यरने (Shreyas Ayyar) आणखी एक महागडी गाडी (Car) खरेदी केलीय. प्रत्येक कारप्रेमीसाठी स्वप्नवत असणाऱ्या मर्सिडिज AMG प्रकारतलं टॉप मॉडेल श्रेयसनं विकत घेतलं असून त्याचे फिचर्स कमाल आहेत.
मर्सिडिज AMG G 63Matic असं या SUV कारचं नाव आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन असणाऱ्या श्रेयस अय्यरनं आयपीएलचा सीझन संपल्यावर नवी गाडी खरेदी केली आहे. या गाडीत 4 लिटरचा V8 बायटर्बो इंजिन बसवण्यात आलं आहे ज्याची क्षमता 430kw ची आहे. त्यामुळे सुरु केल्यावर पहिल्या साडेचार सेकंदातच ही कार 100 चा वेग पकडते. या कारची किंमत आहे 2 कोटी 45 लाख रुपये.
ही कार कंपनीनं श्रेयस अय्यरला डिलिव्हर केल्यावर एक भन्नाट संदेश लिहिला आहे. मर्सिडिज बेंझ G63 कार घरी आल्याबद्दल श्रेयसनं अभिनंदन. स्टार परिवारात आपलं मनापासून स्वागत. आम्हाला तुमचा कव्हर ड्राईव्ह बघायला जेवढी मजा येते, तेवढीच मजा तुम्हाला ही कार चालवताना येईल, अशी अपेक्षा, असा संदेश कंपनीनं त्यांच्या सोशल मीडिया साईटवर लिहीला आहे.
श्रेयस अय्यर हा लग्झरी कारचा शौकीन आहे. त्याच्याकडे ऑडी, लॅम्बोर्गिनी ह्युराकन यासारख्या शक्तीशाली आणि महागड्या गाड्या आहेत. त्याच्याकडे लँबोर्गिनी ह्युराकन ईवो ही कार आहे. या कारमध्ये V10 इंजिन आहे. ही गाडी केवळ 2.9 सेकंदात 100 किलोमीटरचा वेग पकडू शकते. या गाडीचा टॉप स्पीड आहे 350 किलोमीटर प्रति तास.
श्रेयस अय्यरकडे ऑडी 5S देखील आहे. हा प्री-फेसलिफ्ट व्हर्जन आहे. या गाडीत 3 लिटरचं टर्बोचार्ज्ड V6 इंजिन देण्यात आलं आहे. ही फोर व्हील ड्राईव्ह मॉडेल प्रकारातील गाडी आहे. या कारचं इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सला जोडण्यात आलं आहे.
श्रेयस अय्यर हा त्याच्या शैलीदार खेळाप्रमाणेच उत्तमोत्तम कारचा प्रेमी म्हणून ओळखला जातो. आपल्या कमाईतील बहुतांश रक्कम तो महागड्या गाड्या खरेदी करण्यावर खर्च करतो. त्याच्या गॅरेजमध्ये त्याच्या आवडीच्या जवळपास सगळ्या महागड्या गाड्या आहेत. तो स्वतः ड्राईव्ह करतो आणि क्रिकेट दौऱ्यातून वेळ मिळेल, तेव्हा तेव्हा प्रवासाचा आनंद घेत असतो. भारतात क्रिकेटपटू आणि गाड्या हे समीकरण जुनं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरदेखील गाड्यांचा शौकीन आहे. सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीतील त्याने अनेक महागड्या गाड्या खरेदी केल्या होत्या आणि मुंबईतील रस्त्यांवर ड्राईव्ह करणारा सचिन अनेकांना भेटत असे. श्रेयस अय्यरदेखील गाडीप्रेमी आहे आणि करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरच त्याने मोठा पल्ला गाठला आहे.