विराट कोहलीच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, स्टाईलमध्ये पूर्ण केले बॉटल कॅप चॅलेंज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 11, 2019 | 17:08 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

वेस्ट इंडिजविरुद्ध साम्याआधी सोशल मीडियावर सुरू असलेले बॉटल कॅप चॅलेंज अखेर कोहलीने पूर्ण करत आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण केली आहे. विराटने हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

virat kohli
विराट कोहली 

थोडं पण कामाचं

  • विराट कोहलीने पूर्ण केले बॉटल कॅप चॅलेंज
  • आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला व्हिडिओ
  • कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी तयार

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेच्या तयारीत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ही पहिला सामना पावसाने धुवून निघाल्यानंतर मालिकेत आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहे. या सामन्याआधी सोशल मीडियावर सुरू असलेले बॉटल कॅप चॅलेंज विराट कोहलीने पूर्ण करत आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवली आहे. विराटने शनिवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअऱ केला यात त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, कधीही न करण्यासाठी उशिरा केलेले चांगले हॅशटॅग बॉटल कॅप चॅलेंज. 

या १५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कोहली बॅट पकडून बॉटलच्या दिशेने पाहत आहे. यानंतर तो बॅटने बॉटलचे कॅप उघडतो. या व्हिडिओची मजेशीर गोष्ट म्हणजे याच्या बॅकग्राऊंडमध्ये भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कॉमेंट्रीचा वापर करण्यात आला आहे. बॉटल कॅप हटवल्यानंतर विराट कोहली त्या बाटलीतील पाणी पिताना दिसत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे चॅलेंज चांगलेच व्हायरल होत आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावरील हे बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण केले आहे. यात बॉलिवूडचेच नव्हे तर मराठी कलाकारही होते. सर्व क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा होती की विराट कोहली कधी हे चॅलेंज पूर्ण करणार. अखेर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेआधी चाहत्यांची ही प्रतीक्षा कोहलीने पूर्ण केली आहे. कोहली सध्या वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघासोबत आहे. रविवारी दोन्ही संघादरम्यान तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. 

टीम इंडियाने याआधी टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजला धूळ चारत तीनही सामने जिंकत मालिका खिशात घातली होती. आता विराट सेनेचे लक्ष्य वनडे मालिकेतही निर्भेळ यश मिळवणे हे असणार आहे. दरम्यान, विजय अथवा पराभवापेक्षा संपूर्ण १०० ओव्हरचा सामना बघायला मिळेल याची अपेक्षा क्रिकेट चाहते करत आहेत. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की सामना जर पूर्ण झाला तर कोणता संघ बाजी मारतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
विराट कोहलीच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, स्टाईलमध्ये पूर्ण केले बॉटल कॅप चॅलेंज Description: वेस्ट इंडिजविरुद्ध साम्याआधी सोशल मीडियावर सुरू असलेले बॉटल कॅप चॅलेंज अखेर कोहलीने पूर्ण करत आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण केली आहे. विराटने हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...