भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हार्ट अॅटॅक, रुग्णालयात उपचार सुरू - रिपोर्ट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 23, 2020 | 15:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

kapil dev: भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना शुक्रवारी हार्ट अॅटॅक आला. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

kapil dev
कपिल देव यांना हार्ट अॅटॅक, रुग्णालयात उपचार सुरू 

थोडं पण कामाचं

  • भारताचे माजी कर्णधार कपिल देव
  • कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता पहिला वर्ल्डकप
  • कपिल देव यांच्यावर अँजिओप्लस्टीची शस्त्रक्रिया

मुंबई: भारताचे दिग्गज आणि माजी कर्णधार कपिल देव(indian former captain kapil dev) यांना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका(heart attack) आला. भारताला १९८३मध्ये पहिला वहिला वर्ल्डकप मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर नवी दिल्लीच्या फोर्टिस एस्कॉर्ट हार्ट इन्स्टिट्यूट येथे अँजिओप्लास्टी केली जात आहे. 

जसे कपिल देव यांचे वृत्त समोर आले तसे सोशल मीडियावर चाहते त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करू लागले आहेत. भारताला आपल्या नेतृत्वाखाली पहिला वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या कपिल देव यांची गणती जगातील दिग्गज क्रिकेटर्समध्ये केली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ मध्ये वर्ल्डकप मिळवला होता. 

भारताचा क्रिकेटर इरफानने ट्विटरवरून कपिल देव यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. 

सुरेश रैनाने ट्वीट करून कपिल देव यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. तुम्ही लवकर बरे व्हा. असे त्याने म्हटले आहे. 

भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्विटरवरून कपिल देव पाजी यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. 

शिखर धवननेही कपिल देव यांच्यासाठी प्रार्थना केली आहे

कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये १३१ कसोटी आणि २२५ वनडे सामने खेळलेत. त्यांच्या नावावर कसोटीमध्ये ५२४८ धावा आणि ४३४ विकेट आहेत. वनडे आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये त्यानी ३७८३ धावा केल्या यासोबतच २५३ विकेट मिळवल्या. त्यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडिजविरुद्ध फरिदाबादमध्ये १९९४मध्ये खेळला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी