मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळीची(indian former cricketer vinod kambli) फसवणूक(online fraud) झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याला तब्बल एक लाखांपेक्षा अधिकचा गंडा घालण्यात आला आहे.. वांद्रे पोलीस ठाण्यात एका अनोळखी व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. केवायसी अपडेट (KYC update) च्या नावाने विनोद कांबळीकडून तब्बल १,१३,९९८ रूपये फसवणुकीने घेण्यात आले. indian former cricketer vinod kambli loose over 1 lakh in online fraud of KYC update
संपूर्ण प्रकरण हे ३ डिसेंबरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याने स्वत:ला एका प्रायव्हेट बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले. कांबळीकडून त्याची डिटेल्स मागितली ज्यामुळे केवायसी अपडेट करता येईल. जसे त्याला ही माहिती समजली त्याने एक लाखापेक्षा अधिक रक्कम काढून घेतली.
वांद्रे पोलिसांना या प्रकरणाची तक्रार मिळताच त्यांनी सायबर पोलीस आणि बँकेच्या मदतीने पैशांची देवाणघेवाण रिव्हर्स केली. आता पोलीस त्या अकाऊंट होल्डरचे डिटेल्स मिळवत आहेत ज्याच्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले.
कांबळीने सांगितले फोनवर अलर्ट मिळताच मी तातडीने बँके्या कस्टमर केअर नंबरवर कॉल केला आणि अकाऊंट ब्लॉक केले. यानंतर मी पोलिसांकडे पोहोचलो. माझे पैसे परत करण्यात माझी मदत केल्याने मी पोलिसांचा आभारी आहे.
अशा प्रकारचे सायबर फसवणुकीच्या जाळ्यात अडकण्याचे हे काही नवीन प्रकरण नाही. अशा पद्धतीने अनेक गुन्हेगार लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. दरम्यान, बँकांकडून नेहमी अशी माहिती दिली जाते की बँक कोणालाही फोनवरून त्यांची माहिती विचारत नाही. तसेच इतर डिटेल्सही विचारत नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या फोन कॉल्सना कोणीही बळी पडू नये.