मुंबई: भारतीय संघाने(india vs zimbabwe) झिम्बाब्वेविरुद्ध धमाकेदार अंदाजात विजय मिळवला. टीम इंडियाकडून(team india) गोलंदाजी(bowling) आणि फलंदाजीमध्ये(batting) दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. शुभमन गिल(shubhman gill) झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने १३ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. यासोबतच टीम इंडियाने मालिकेत क्लीन स्वीप केले. यानंतर सर्व भारतीय खेळाडू एका गाण्यावर थिरकताना दिसले. Indian player dance after win against zimbabwe
अधिक वाचा - टीम इंडियानं पाकिस्तानच्या या विक्रमाशी केली बरोबरी
शिखर धवनने सोशल मीडयावर एका शानदार मालिका विजयानंतर संपूर्ण टीमचा जबरदस्त डान्स करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला. यात खेळाडू जल्लोष करताना दिसत आहे. यात भारतीय खेळाडू काला चश्मा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओची सुरूवात केएल राहुल करतात. यानंतर तो बाजूला होतो. त्यानंतर इशान किशन जबरदस्त स्टेप करताना दिसतो आणि बाकी खेळाडू त्याला फॉलो करतात.
व्हिडिओमध्ये शिखर धवनने काला चश्मा लावला आहे आणि सर्व खेळाडू खूप खुश दिसत आहेत. व्हिडिओमध्ये केएल राहुल, इशान किशन, शुभमन गिल, कुलदीप यादव, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, शाहबाज अहमद, राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर शिखर धवन भांगडाही करतो.
अधिक वाचा - थरकाप उडवणारी मर्डर मिस्ट्री
तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवला. झिम्बाब्वेसाठी सिकंदर रजाने आपला शानदार फॉर्म कायम ठेवला. त्याने सहाव्या डावात आपले तिसरे शतक ठोकत झिम्बाब्वेला विजयाकडे नेण्याचा पुरेपू प्रयत्न केला मात्र झिम्बाब्वेचा संघ हे लक्ष्य गाठू शकले नाहीत. याआधी भारताकडून शुभमन गिलने तुफानी खेळी करत १३० धावा करताना वनडे क्रिकेटमधील आपले पहिले शतक ठोकले. तर इशान किशनने ५० धावा केल्या.