IPL संदर्भातली मोठी बातमी, सौरभ गांगुलीनं दिले 'हे' संकेत

IPL 2020 postpone: कोरोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाऊन वाढवून 3 मे पर्यंत करण्यात आलं आहे. बीसीसीआयनं आयपीएल 13 अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.

IPL 2020
IPL संदर्भातली मोठी बातमी, सौरभ गांगुलीनं दिले 'हे' संकेत 

थोडं पण कामाचं

  • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 सुद्धा अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
  • आयपीएल 2020 पुढे कधी होईल याबाबत काहीही स्पष्ट माहिती दिली नाही आहे.
  • आयपीएल 2020 ची सुरुवात 29 मार्चला होणार होती.

नवी दिल्लीः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 14 एप्रिलपासून वाढवून 3 मेपर्यंत करण्यात आली आहे. यासोबतच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 सुद्धा अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आयपीएल 2020 पुढे कधी होईल याबाबत काहीही स्पष्ट माहिती दिली नाही आहे. बोर्डाच्या सुत्रांनी सांगितलं की, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आता 3 मे रोजीनंतर आयपीएल 2020 वर काही तरी विचार करतील. तोपर्यत आयपीएलचा यंदा होणारा 13 वा सिझन पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविल्यानंतर आयपीएल स्थगित करण्यात येणार आहे.

आयपीएल 2020 ची सुरुवात 29 मार्चला होणार होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 15 एप्रिलपर्यंत स्थगित केली गेली. केंद्र सरकारनं याआधी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला होता. 

सौरभ गांगुलींनी दिले संकेत

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, सध्याच्या परिस्थितीत कोणताही खेळ शक्य नाही. तर, आयपीएल अशक्य होत नाही, कारण परदेशी क्रिकेटपटूंना या वेळी येथे येणे अवघड जाईल. त्यामुळं आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत गांगुलीने याआधी संकेत दिले होते. आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 मेनंतर यावर निर्णय घेतला जाईल.

3 मे नंतर केंद्र सरकार लॉकाडाउन संदर्भात नेमकं काय निर्णय घेतं हे पाहिल्यानंतर स्पर्धेच्या भवितव्याबद्दल बीसीसीआय आपली अधिकृत बाजू मांडणार आहे. यंदा 29 मार्च ते 24 मे या कालखंडात आयपीएलचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा केंद्र सरकारने परदेशी खेळाडूंना व्हिसा देण्यास नकार दिला होता. सरकारने 15 एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आयपीएलमधील विविध संघांनी ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याची मागणी बीसीसीआयला केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी