Team India: विश्वविक्रम करण्यापासून भारतीय संघ एक पाऊल दूर; आफ्रिकेविरूद्ध इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 04, 2022 | 15:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SA T20 Series । भारतीय संघ हा टी-२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. दरम्यान काही दिवसांतच भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे.

Indian team one step away from setting world record, A opportunity to make history against south Africa
विश्वविक्रम करण्यापासून भारतीय संघ एक पाऊल दूर, वाचा सविस्तर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विश्वविक्रम करण्यापासून भारतीय संघ एक पाऊल दूर.
  • ९ जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे.
  • टी-२० मालिकेतील पाच सामने ५ वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जातील.

IND vs SA T20 Series । मुंबई : भारतीय संघ (Team India) हा टी-२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. दरम्यान काही दिवसांतच भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील (South Africa) टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. ९ जून रोजी होणारा पहिला टी-२० सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून विश्वविक्रम करण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी असणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल. (Indian team one step away from setting world record, A opportunity to make history against south Africa). 

अधिक वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला १६ अटींसह परवानगी

विश्वविक्रम करण्यापासून एक पाऊल दूर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना भारतीय संघासाठी ऐतिहासिक सामना ठरू शकतो. कारण भारतीय संघाने या सामन्यात आफ्रिकेला चितपट केले तर टी-२० क्रिकेटमध्ये सलग १३ सामने जिंकणारा भारत पहिला संघ बनेल. हा विश्वविक्रम करण्यासाठी भारतीय संघाला आफ्रिकेला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागणार आहे. आतापर्यंत अफगाणिस्तान आणि रोमानियाच्या संघानी टी-२० मध्ये सलग १२ सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.

के. एल राहुल सांभाळणार धुरा

भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे इतके सोपे असणार नाही. तसेच या मालिकेत भारतीय संघाची धुरा के.एल राहुलकडे असणार आहे. राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकण्यात यश आले नाही. त्याने ४ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले असून या सामन्यांमध्ये संघाला फक्त पराभवच मिळाला आहे. लक्षणीय बाब म्हणजे के.एल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हे सर्व सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळले आहेत.

पराभवाचा बदला घेण्यासाठी राहुल सेना सज्ज

टी-२० मालिकेतील पाच सामने ५ वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जातील. दोन्ही संघांमधील ही टी-२० मालिका खूपच रोमांचक होणार आहे. मागील वर्षी आफ्रिका दौऱ्यावर भारताला कसोटी मालिकेत २-१ आणि एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीपसह पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील पराभवाचा बदला घेण्याची भारताला चांगली संधी असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी