ICC U19 World Cup: गेल्या वर्ल्ड कपच्या फायनलचा वचपा घेण्यासाठी भारत सज्ज, बांगलादेशसोबत क्वार्टर फायनल

ICC U19 World Cup IND vs BAN | आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघाने सलग तीन सामने जिंकले आणि सुपर लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता भारतीय संघाचा आगामी सामना गतविजेत्या बांगलादेशशी होणार आहे. हा सामना २९ जानेवारीला कुलिज क्रिकेट ग्राउंड अँटिग्वा येथे खेळवला जाईल.

Indian team ready to avenge previous loss to Bangladesh in ICC U19 World Cup quarter-finals
उपांत्यपूर्व फेरीत भारत-बांगलादेश आमनेसामने   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघाने सलग तीन सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
  • भारत आणि बांगलादेशमधील उपांत्यपूर्व फेरीतील सामना २९ जानेवारीला होणार आहे.
  • बांगलादेशकडून झालेल्या मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज.

ICC U19 World Cup IND vs BAN | नवी दिल्ली :  आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२२ (ICC U19 World Cup 2022) मध्ये भारतीय संघाने सलग तीन सामने जिंकले आणि सुपर लीगच्या उपांत्यपूर्व (Quarter-Finals) फेरीत प्रवेश केला आहे. आता भारतीय संघाचा आगामी सामना गतविजेत्या बांगलादेशशी होणार आहे. हा सामना २९ जानेवारीला कुलिज क्रिकेट ग्राउंड अँटिग्वा येथे खेळवला जाईल. लक्षणीय बाब म्हणजे चार वेळा जेतेपद पटकावलेल्या भारतीय संघाने सुपर लीगच्या टप्प्यात एकही सामना न गमावता प्रवेश केला. संघाने तीन्ही सामने जिंकून ग्रुप बी मध्ये अव्वल स्थान पटकावले आणि आता गतविजेत्या बांगलादेशशी सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Indian team ready to avenge previous loss to Bangladesh in ICC U19 World Cup quarter-finals). 

अधिक वाचा : काही देशांत १० लाखाला एक टोमॅटो, तर १० हजारात सिलेंडर

राज बावा आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्या शतकीय खेळींमुळे भारताने दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडलच्या संघाला पराभूत केले. तर तिसऱ्या सामन्यात विजयी हॅट्रिक लगावून युगांडाविरूध्द ३२६ धावांनी मोठा विजय मिळवला. बांगलादेशचा मार्ग एवढा सोपा नव्हता, कारण २०२० चा चॅम्पियन राहिलेल्या इंग्लंडकडून आपला पहिला सामना गमावल्यानंतर बांगलादेशचा संघ ग्रुप ए मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला होता. त्यानंतर कॅनडावर आठ गडी राखून विजय आणि त्यानंतरच्या सामन्यात पावसामुळे नऊ गडी राखून (DLS) विजय मिळाला. त्यामुळे बांगलादेशने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. दोन वर्षांपूर्वी अंतिम फेरीचा सामना निश्चित करण्यासाठी यूएईविरूध्दच्या (UAE) सामन्यात व्यत्यय आला होता. 

अधिक वाचा : BPL 2022: वॉर्नरनंतर आता ब्रावोचा Srivalli डान्स

दरम्यान, आता आगामी सामन्यात भारतीय संघ २०२० मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे आता २९ जानेवारीला होणाऱ्या सामन्यात भारत बांगलादेशला चितपट करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतासोबतच इंग्लंडचा संघ देखील क्लीन स्विप करून सुपर लीगच्या अंतिम टप्प्यात पोहचला आहे. संघाने कॅनडा आणि संयुक्त अरब अमिरातीवर अनुक्रमे १०६ आणि बांगलादेशवर १८९ धावांनी विजय मिळवला.

तर टॉम परस्टने इंग्लंडचे सर्व सामन्यांत नेतृत्व केले आहे. त्याने त्याच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये नाबाद ९३ आणि १५४ धावा करून ग्रुप बी मधील उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी