India's Asia Cup 2022 : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर, पाहा कोण संघात कोणाला डच्चू?

India's Asia Cup 2022 squad Announced: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया चषक 2022 साठी संघाची घोषणा केली आहे. दोन महत्त्वाचे खेळाडू परतले आहेत, तर दोन खेळाडू दुखापतीमुळे बाहेर ठेवण्यात आलं आहे.

indian team squad announced for asia cup 2022 know who came back and who was out india vs pak
India's Asia Cup 2022 : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर  |  फोटो सौजन्य: AP, File Image
थोडं पण कामाचं
  • आशिया कप क्रिकेट स्पर्धा 2022
  • या महिन्यात सुरू होणार आहे स्पर्धा
  • भारतीय संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी

Asia Cup 2022: मुंबई: बीसीसीआयने (BCCI) सोमवारी आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) साठी 15 सदस्यीय भारतीय संघाची (Team India) घोषणा केली आहे. 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) या संघाचे नेतृत्व करेल तर केएल राहुल (KL Rahul) उपकर्णधार असेल. कोरोनाचा संसर्ग झाल्याने  केएल राहुल वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळू शकला नव्हता. तसेच एका शस्त्रक्रियेतून बरा झाल्यानंतर आता तो संघात परतला आहे. (indian team squad announced for asia cup 2022 know who came back and who was out india vs pak) 

राहुलशिवाय अनुभवी फलंदाज विराट कोहलीनेही पुनरागमन केले आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर कोहली भारतीय संघाचा भाग नव्हता. गेल्या महिन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. कोहलीने 17 जुलै रोजी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 22 चेंडूत 17 धावा केल्या होत्या. तो बऱ्याच दिवसांपासून मोठी खेळी खेळण्यासाठी झगडत आहे.

अधिक वाचा: आशिया कपमध्ये पाकिस्तान नव्हे तर हा संघ आहे भारतासाठी धोकादायक

बुमराह आणि हर्षल बाहेर

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतींमुळे भारतीय संघाबाहेर आहेत. बीसीसीआयने ट्विट करून दोघांबाबत माहिती दिली आहे. दुखापतीमुळे बुमराह आणि हर्षल निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे बोर्डाने म्हटले आहे. दोघेही तंदुरुस्त होण्यासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे रिहॅबिलिटेशनवर आहेत. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत बुमराह शेवटचा मैदानात दिसला होता. तो पाठीच्या दुखापतीने गेले काही दिवस त्रस्त आहे.

अधिक वाचा: Dinesh Karthikच्या पत्नीने CWG 2022मध्ये जिंकले मेडल, क्रिकेटरने दिली ही प्रतिक्रिया

त्याचवेळी हर्षल बरगडीच्या दुखापतीशी झुंज देत आहे. हर्षलने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामनाही इंग्लंडविरुद्ध खेळला, जो टी-२० होता. मात्र, मुख्य संघातून वगळलेल्या खेळाडूंच्या नावांमध्ये फलंदाज श्रेयस अय्यर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांचा समावेश आहे. अय्यर आणि पटेल हे स्टँडबाय खेळाडू असतील. स्नायूंचा ताण आणि पाठीच्या दुखापतीमुळे चार महिन्यांपासून संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज दीपक चहर हाही राखीव खेळाडू आहे.

आशिया कप 2022 साठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.

स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी