indian tennis player rohan bopanna becomes oldest player to win atp masters 1000 title : भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा (Rohan Bopanna, India) याने ऐतिहासिक कामगिरी केली. रोहनने बीएनपी परिबास ओपन टेनिस टुर्नामेंटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅट अॅबडेनच्या (Matthew Ebden or Matt Ebden, Australia) सोबतीने पुरुष दुहेरीची एटीपी मास्टर्स 1000 प्रकारातली स्पर्धा जिंकली. एटीपी मास्टर्स 1000 प्रकारातली स्पर्धा जिंकणारा रोहन हा आतापर्यंतचा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू आहे. तो 43व्या वर्षी स्पर्धा जिंकला. त्याचा जोडीदार अॅबडेन 35 वर्षांचा आहे.
रोहन आणि मॅट या जोडीने शनिवार 18 मार्च 2023 रोजी फायनलमध्ये नेदरलँड्सच्या वेस्ले कूलहोफ (Wesley Koolhof, Netherlands) आणि यूकेच्या नील स्कूप्स्की (Neal Skupski, United Kingdom) या जोडीचा 6-3, 2-6, 10-8 असा पराभव केला.
दहाव्यांदा एटीपी मास्टर्स 1000 प्रकारातील फायनलमध्ये खेळत असलेल्या रोहनने आपल्या अनुभवाचा व्यवस्थित वापर करून विजयाचा मार्ग सोपा केला. एका सर्वोत्तम प्रतिस्पर्धी जोडीविरुद्धच्या फायनलमध्ये मॅटच्या साथीने विजय मिळवू शकलो याचा खूप आनंद वाटत असल्याचे रोहनने विजयानंतर सांगितले.
रोहनने एटीपी मास्टर्स 1000 प्रकारातील स्पर्धा जिंकून डॅनियल नेस्टरला मागे टाकले. डॅनियल नेस्टरने 42व्या वर्षी एटीपी मास्टर्स 1000 प्रकारातील स्पर्धा जिंकली होती. तो 2015 मध्ये सिनसिनाटी मास्टर्स जिंकला होता.
रोहन बोपण्णा या विजयासह एकूण पाच वेळा एटीपी मास्टर्स 1000 प्रकारातील स्पर्धा जिंकला. तो 2017 च्या मोंटेकार्लो ओपननंतर पहिल्यांदाच पुरुष दुहेरीत विजेता झाला. रोहन आणि मॅट या जोडीने एटीपी मास्टर्स 1000 प्रकारातील स्पर्धेत तिसऱ्यांदा फायनल खेळण्याची कामगिरी बजावली.
बिर्याणीचे हे प्रकार माहिती आहेत का?
एप्रिल महिन्यात फिरण्याची भारतातील उत्तम ठिकाणे