मुंबई: भारतीय महिला क्रिकेट कसोट आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राजने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३९ वर्षीय मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान तिने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलेत. न्यूझीलंडमध्ये आयोजित झालेल्या महिला वनडे वर्ल्डकपमध्ये तिने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतरही तिच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र तिने याबाबत नंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. Indian women cricketer mithali raj announce retirement from international cricket
Thank you for all your love & support over the years! — Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u
आपल्या २३ वर्षीय लांब करिअरमध्ये मिताली राजने १२ कसोटी, २३२ वनडे आणि ८९ आंतरराष्ट्रीय टी-२० ामने खेळले. या दरम्यान तिने धांवांचा डोंगर उभा केला. महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये तिने २३२ सामन्यांत ७८०५ धावा करत एक रेकॉर्ड केला. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारापेक्षा जास्त धावा करणारी पहिली भारतीय आणि जगातील दुसरी महिला क्रिकेटर आहे.
मिलातीने १९९९मध्ये वयाच्या १६व्या वर्षी भारतासाठी आयर्लंडविरुद्ध मिल्टन केन्समध्ये वनडेत पदार्पण केलो होते. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही आणि सातत्याने ती यशाची शिखरे चढत गेली. तिने २००२मध्ये लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केल होते. तर २००६मध्ये इंग्लंडविरुद्ध डर्बीमध्ये करिअरमधील पहिला टी-२० सामना खेळला होता.
३ डिसेंबर १९८२मध्ये राजस्थानच्या जोधपूर येथे जन्मलेल्या मितालीने अजून लग्न केलेले नाही. इतके वय झालेले असतानाही तिने लग्न न करण्याचे कारण खास आहे. मिड डेला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये मितालीने हे गुपित उघड केले. तिने सांगितले की खूप दिवस आधी मी जेव्हा खूप लहान होती तेव्हा माझ्या डोक्यात विचार येत होते मात्र जेव्हा मी विवाहित लोकांना पाहायचे तेव्हा हे विचार माझ्या डोक्यात येत नाही. मी सिंगल असताना खूप खुश आहे.