Womens Hockey WC 2022 : महिला हॉकी विश्वचषकातील भारताचा प्रवास समाप्त, शेवट गोड करत जपानवर 3-1 ने विजय

महिला हॉकी विश्वचषकात  (Womens Hockey World Cup 2022) भारतीय महिला संघ हवी तशी  कामगिरी (India Women's Hockey Team) करु शकला नाही. पण या स्पर्धेतील अखेरचा सामना न आत्मशक्ती न घालवता भारतीय महिला संघाने खेळला आणि या सामन्यात जपानला 3-1 ने मात देत भारताने स्पर्धेचा शेवट गोड केला.

Japan lost by Indian women's hockey team in the final match
भारतीय महिला हॉकी संघाकडून जपान पराभूत   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • अखेरच्या सामन्यात भारतीय महिलांनी सुरुवातीपासून चांगली झुंज दिली.
  • महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाची खराब कामगिरी
  • जपानच्या असाई यू हिने जपानकडून पहिला गोल केला.

Women's Hockey World Cup 2022 : महिला हॉकी विश्वचषकात  (Womens Hockey World Cup 2022) भारतीय महिला संघ हवी तशी  कामगिरी (India Women's Hockey Team) करू शकला नाही. पण या स्पर्धेतील अखेरचा सामना भारतीय महिला संघाने आत्मविश्वास कमजोर न होऊ देता  खेळला आणि जपानला 3-1 ने मात देत भारताने स्पर्धेचा शेवट गोड केला. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या क्रॉस ओव्हर सामन्यात स्पेनने भारताला मात दिल्यामुळे भारत स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पण पूल सामन्यात आज जपानला भारताने 3-1 ने नमवल्यामुळे भारताचा स्पर्धेतील शेवट किमान गोड झाला आहे. 

महिला हॉकी विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाने अत्यंत खारब कामगिरी केली. भारताने केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे, तोही अखेरच्य सामन्यात. पूली बीमधील सामन्यात इंग्लंड आणि चीननं भारतासोबत 1-1 अशी बरोबरी साधली. तर, न्यूझीलंडविरुद्ध 4-3 आणि स्पेनविरुद्ध 1-0 नं भारताला परभव स्वीकारावा लागला. ज्यानंतर आता जपानविरुद्ध केवळ भारत 3-1 ने विजयी झाला आहे.
दरम्यान अखेरच्या सामन्यात भारतीय महिलांनी सुरुवातीपासून चांगली झुंज दिली.

सर्वात आधी 19 व्या मिनिटाला जपानच्या असाई यू हिने गोल करत जपानला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर मात्र भारतीय महिलांनी आक्रमक कामगिरी सुरू केली. 29 व्या मिनिटाला नवनीत कौरने पहिला गोल केला. त्यानंतर 37 व्या मिनिटांला एक्का दीप ग्रेसने गोल करत सामन्यात भारताला आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर 44 व्या मिनिटाला पुन्हा एकदा नवनीत कौरने गोल करत भारताचा विजय पक्का केला. ज्यानंतर अखेरपर्यंत सामन्यात एकही गोल झाला नाही आणि भारत 3-1 ने सामना जिंकला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी