ICC Cricket World Cup: जाणून घ्या, विजय शंकरने तीन महिन्यांत कसे मिळवले वर्ल्ड कपचे तिकीट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 16, 2019 | 09:10 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

ICC World Cup: इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या आगामी वर्ल्डकप २०१९साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात सगळ्यात आश्चर्यचकित करणारे नाव म्हणजे ऑलराऊंडर विजय शंकर याचे.

vijay shankar
विजय शंकर  |  फोटो सौजन्य: AP

मुंबई : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९साठी सोमवारी १५ सदस्यी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. ३० मे पासून इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केली. भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीच्या हाती आहे. संघात अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे. युवा खेळाडूंमध्ये सगळ्यांना आश्चर्यचकित करणारे नाव म्हणजे ऑलराऊंडर विजय शंकर हे आहे.

एक वर्षाआधी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शंकरने खूपच कमी वेळात वर्ल्डकपमध्ये आपले स्थान मिळवले. त्याने गेल्या वर्षी ६ मार्चला श्रीलंकेविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या शंकरने आपल्या जबरदस्त खेळाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्याने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात या वर्षी १८ जानेवारीला वनडे क्रिकेट करियरची सुरूवात केली होती. 

आतापर्यंत त्याने ९ वनडे सामने खेळलेत. यातील पाच डावांत त्याने ३३च्या सरासरीने आणि ९६.४९च्या स्ट्राईक रेटने १६५ धावा केल्या. या दरम्यान, ४६ ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तर गोलंदाजीतील कमालही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरमध्ये दाखवली होती. यात त्याने दोन विकेट घेतल्या आहे. मात्र त्यानंतरही त्याला संघात स्थान देण्यात आले कारण त्याच्याकडे लांब षटकार ठोकण्याची क्षमता आहे. 

विजय शंकर ओव्हरदरम्यान फलंदाजी करत वेगाने धावा करू सकतो. त्याला टी-२० क्रिकेटमध्ये चौथ्या नंबरवर स्थान देण्यात आले. तेथेही त्याने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. याच कारणामुळे त्याला वर्ल्डकप संघात स्थान देण्यात आले आहे. तर हार्दिक पांड्याला बॅकअपच्या रूपात ऑलराऊंडर म्हणून सामील करण्यात आले आहे. दुहेरी भूमिका त्याला संघात जागा मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ICC Cricket World Cup: जाणून घ्या, विजय शंकरने तीन महिन्यांत कसे मिळवले वर्ल्ड कपचे तिकीट Description: ICC World Cup: इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या आगामी वर्ल्डकप २०१९साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात सगळ्यात आश्चर्यचकित करणारे नाव म्हणजे ऑलराऊंडर विजय शंकर याचे.
Loading...
Loading...
Loading...