India's 18-member squad for upcoming ODI and T20I series against West Indies । मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतात होणार असलेल्या वन डे आणि टी २० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. बीसीसीआयच्या निवड समितीने प्रत्येकी अठरा खेळाडूंचा संघ वन डे आणि टी २० मालिकेसाठी जाहीर केला.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध ते खेळणार नाही. के. एल. राहुल वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वन डे पासून संघाकरिता खेळण्यासाठी उपलब्ध असेल. रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमधून सावरत असल्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणार नाही. अक्षर पटेल वेस्ट इंडिज विरुद्ध फक्त टी २० मालिकेत खेळणार आहे; अशी माहिती बीसीसीआयने दिली.
वन डे साठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण, आवेश खान
टी २० साठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल