भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा बघा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर

India's Australia Cricket Tour Live on Sony Pictures Sports Network भारताचा क्रिकेट संघ आयपीएल नंतर संयुक्त अरब आमिराती येथून विमानाने थेट ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.

India's Australia Cricket Tour Live on Sony Pictures Sports Network
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा बघा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर 

थोडं पण कामाचं

 • भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा बघा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर
 • विराट कोहली टी ट्वेंटी, वन डे आणि टेस्टसाठी भारताचा कर्णधार
 • ३ वन डे, ३ टी ट्वेंडी आणि ४ टे स्ट मॅच होणार; ४ पैकी पहिली टेस्ट पिंक बॉलने डे नाईट खेळणार

मुंबईः भारताचा (India) क्रिकेट (Cricket) संघ आयपीएल (IPL 2020) नंतर संयुक्त अरब आमिराती येथून विमानाने थेट ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. कोरोना संकटामुळे तब्बल नऊ महिन्यांनंतर भारत आंतरराष्ट्रीय दौरा करत आहे. याआधी भारताचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. हा दौरा पूर्ण करुन मार्च महिन्यात मायदेशी परतलेला भारताचा संघ मोठ्या अंतरानंतर थेट नोव्हेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करत आहे. या दरम्यान भारतीय क्रिकेट संघ एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेला नाही. (India's Australia Cricket Tour Live on Sony Pictures Sports Network from November 27, 2020)

भारताची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सर्वात आधी सिडनीत पोहोचेल. सिडनीत खेळाडू क्वारंटाइन राहतील. क्वारंटाइनची मुदत संपल्यानंतर खेळाडू सराव सुरू करतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत तीन वन डे आणि तीन टी ट्वेंटी मॅच होतील. यानंतर जे खेळाडू टेस्ट खेळणाऱ्या संघात नाहीत ते मायदेशी परततील. फक्त टेस्टसाठीचा भारतीय संघच ऑस्ट्रेलियात जवळपास दोन महिने असेल. या स्पर्धेतील सर्व मॅचचे थेट प्रक्षेपण सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्क (Sony Pictures Sports Network - SPSN) करणार आहे.

मॅचची इंग्रजीतील कॉमेंट्री (समालोचन) सोनी टेन वन (SONY TEN 1 channel) येथे उपलब्ध आहे. तसेच मॅचची हिंदी कॉमेंट्री सोनी टेन थ्री (SONY TEN 3 channel) येथे उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त इंग्रजी तामीळ आणि तेलुगु भाषेतील कॉमेंट्री सोनी सिक्स (SONY SIX channel) येथे उपलब्ध आहे.

सध्या टी ट्वेंटी आणि टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. वन डे क्रिकेटमध्ये भारत दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. अशा परिस्थितीत स्पर्धा आणखी रंगतदार होईल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०२०-२१)

 वन डे

 1. पहिली वन डे - २७ नोव्हेंबर, सिडनी
 2. दुसरी वन डे - २९ नोव्हेंबर, सिडनी
 3. तिसरी वन डे - १ डिसेंबर, कॅनबेरा

टी ट्वेंटी

 1. पहिली टी ट्वेंटी - ४ डिसेंबर, कॅनबेरा
 2. दुसरी टी ट्वेंटी - ६ डिसेंबर, सिडनी
 3. तिसरी टी ट्वेंटी - ८ डिसेंबर, सिडनी

टेस्ट

 1. पहिली टेस्ट - १७ ते २१ डिसेंबर (डे नाईट, पिंक बॉल मॅच), अॅडलेड
 2. दुसरी टेस्ट - २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न
 3. तिसरी टेस्ट - ७ ते ११ जानेवारी, सिडनी
 4. चौथी टेस्ट - १५ ते १९ जानेवारी, ब्रिस्बेन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी ट्वेंटी भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन डे भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, मयांक अगरवाल, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टेस्ट भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमान विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

चार अतिरिक्त गोलंदाज भारतीय टीमसोबत ऑस्ट्रेलियाला जातील - कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, इशान पोरेल, टी. नटराजन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी