IND vs WI: भारताचा वेस्ट इंडिजवर 119 धावांनी सर्वात मोठा विजय; शुबमन गील बनला प्लेयर ऑफ द सिरीज

IND vs WI, 3rd ODI : टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय मालिकेत (ODI series) वेस्ट इंडिजचा (West Indies) पराभव (defeat) केला आहे. भारताने (India) वनडे मालिका (ODI series) ३-० ने जिंकली (won). भारतीय संघ (Indian team) 39 वर्षांपासून वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे आणि त्यांनी प्रथमच कॅरेबियन संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर क्लीन स्वीप (clean sweep) केला आहे.

India whitewash West Indies by winning the series 3-0
3-0 ने मालिका जिंकत भारताचा वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमानुसार विंडीजसमोर 35 षटकांत 257 धावांचे लक्ष्य ठेवले.
  • प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 26 षटकांत 137 धावांत गारद
  • सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली.

नवी दिल्ली : भारताने (India) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (third ODI) वेस्ट इंडिजचा (West Indies) 119 धावांनी पराभव केला. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (Team India) डकवर्थ लुईस नियमानुसार विंडीजसमोर 35 षटकांत 257 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 26 षटकांत 137 धावांत गारद झाला. ब्रँडन किंग (Brandon King) आणि निकोलस पूरन (Nicholas Pooran) यांनी त्यांच्या संघाप्रमाणे सर्वाधिक 42-42 धावा केल्या. 

त्याचबरोबर भारताकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. एकदिवसीय मालिकेनंतर आता भारतीय संघ 29 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.  रोहित शर्मा टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. विराट आणि जसप्रीत बुमराह वनडेनंतर टी-20 मालिकाही खेळणार नाहीत. दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली. तुफान फटकेबाजीनंतरही पावसाच्या व्यत्ययामुळे भारत 36 षटकंच खेळू शकला. यात 225 धावा भारताने केल्या. ज्यानंतर विजयासाठी वेस्ट इंडीजला 35 षटकात 257 धावा करायच्या होत्या.

Read Also : राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर पद्म पुरस्कारांसाठी सुचवा नावं

पण भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीनंतर 137 धावांतच वेस्ट इंडीज सर्वबाद झाल्याने भारताने सामना 119 धावांनी जिंकला आहे. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. हा निर्णय कर्णधार शिखरसह सलामीवीर गिलने योग्य ठरवत तुफान सुरुवात केली. शिखर अर्धशतक ( धावा 58) झळकावून बाद झाल्यावर श्रेयसने गिलला साथ देत चांगला खेळ कायम ठेवला. नंतर श्रेयस ( धावा 44) आणि पाठोपाठ सूर्यकुमार ( धावा 8) बाद झाला. पण गिलने फटकेबाजी कायम ठेवली. पण सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यात विलंब झाला अखेर 36 षटकानंतर सामना थांबवण्यात आला. गिलने नाबाद 98 धावा केल्या. 

पावसामुळे सामन्यात व्यत्यय 

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाने दोनदा व्यत्यय आणला आणि दोन्ही वेळा भारतीय डाव थांबवावा लागला. पहिल्यांदा सामना जेव्हा थांबवण्यात आला तेव्हा पंचांनी 40 षटकांचा सामना करण्याचा निर्णय दिला. त्याचवेळी दुसऱ्यांदा सामना जेव्हा थांबला होता तेव्हा सामना 35 षटकांचा करण्यात आला. भारत नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत होता. दुसऱ्यांदा खेळ थांबेपर्यंत 36 षटकांत 3 बाद 225 धावा केल्या होत्या.  मात्र, 35 षटकांचा सामना असल्याने DLS अंतर्गत वेस्ट इंडिजला 257 धावांचे लक्ष्य मिळाले, परंतु वेस्ट इंडिजचा संघ केवळ 137 धावा करू शकला.

Read Also : मुंबईच्या रस्त्यांवर २१ हजार कोटींचा खर्च झाला पण...

भारताने केला एक विक्रम 

या विजयासह टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. भारताने वनडे मालिका 3-0 ने जिंकली. भारतीय संघ 39 वर्षांपासून वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे आणि त्यांनी प्रथमच कॅरेबियन संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर क्लीन स्वीप केला आहे.

शुभमन गिलला त्याच्या नाबाद 98 धावांसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. शुभमनने या मालिकेतील तीन सामन्यांत 205 धावा केल्या. यासाठी त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरविण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी